स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना
व्यवस्थापनासाठी सूचना
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २२८८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २११३०८ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक १५/१२/२०२५ ते दिनांक १५/०१/२०२६ एवढा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये १७०१०८ उमेदवारांनी त्यांची स्व-प्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहेत.पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे.
२. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक ०१ मे २०२६ ते दिनांक ३१ मे २०२६ या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे.
३. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण TAIT 2022 च्या भरतीप्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच User Id व Password वापरून लॉगीन करता येईल. अन्यथा सरल प्रणालीतील user id हा या पोर्टलचा देखील user id असेल. व्यवस्थापनास Forgot Password यावर क्लिक केल्यानंतर option for Reset Password मध्ये using onetime Password (OTP) sent via sms खाली व्यवस्थापनाचा सरल पोर्टल चा User id नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून Proceed यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल, आलेला OTP नोंद करुन verify यावर क्लिक करावे त्यानंतर Reset Password मध्ये New Password / confirm New Password नमूद करुन Captcha टाकून change Password यावर क्लिक करावे त्यानंतर नव्याने Reset केलेला Password टाकून लॉगीन करता येईल. सरल पोर्टलवर नोंद असलेला संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरल पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने Password Reset होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्याशी संबंधित शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात जाऊन त्यांचे लॉगीनवरून मोबाईल क्रमांक बदल करुन नव्याने Password Reset करता येईल.
४. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदूनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त (मावक), मा. विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.
५. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदूनामावालीनंतर SEBC चे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदूनामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.
६. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदूनामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधिताना लॉगीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
७. बिंदूनामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहेत.
8. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदूनामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी.
९. शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक दिनांक ०१/०१/२०२६ अनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर म्हणजे मे २०२६ अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पद भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
१०. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी.
११. रिक्त पदापैकी एखादया / काही पदाबाबत मा. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदूनामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी.
१२. इ 1 ली ते इ 5 वी /इ ६ वी ते इ ८ वी / इ ९ वी ते इ १० वी / इ ११ वी ते इ १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल.
१३. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९, २५/०२/२०१९, १२/०६/२०१९ व १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.
१४. शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आली आहे.
१५. इ ६ वी ते इ ८ वी या गटातील भाषा, गणित-विज्ञान, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या प्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल.
अ) फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास 'गणित' हा विषय निवडावा.
आ) फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास 'विज्ञान' हा विषय निवडावा.
इ) गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास 'गणित-विज्ञान' असा विषय निवडावा.
शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .