शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत.

शाळापूर्व तयारी अभियान २०२६-२७ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत.

SCERT ने दि 24 एप्रिल २०२6 च्या परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत कि 

उपरोक्त विषयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांचे मार्फत प्रथम संस्थेच्या सहकार्याने एप्रिल ते जून या दरम्यान “पहिले पाऊल ” – शाळापूर्व तयारी अभियान शैक्षणिक वर्ष २०२२- २३ ते २०२४-२५ ह्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून असे दिसून आले की, शाळेत जाण्यापूर्वी पहिलीत दाखलपात्र मुलांची माता/ पालक घरीच शाळापूर्व तयारी करून घेतात. ज्यामुळे पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यक पूर्वतयारी होते आणि विद्यार्थ्यांना पुढील अध्ययन करणे सुलभ जाते.

सर्व शाळांना या अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात व यशस्वितेचा अनुभव असल्याने शैक्षणिक वर्ष २०२६- २७ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थ्याची शाळापूर्व तयारी करून घेण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम विना अर्थ सहाय्य तत्वावर राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२६ मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्यादरम्यान ६ ते ७ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.


क) राज्यस्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप

उपरोक्त तक्त्यातील अ.क्र. १ मध्ये नमूद सर्वांसाठी राज्यस्तरावरून online बैठकीचे झूमच्या माध्यमातून आयोजन दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय online बैठकीची लिंक स्वतंत्रपणे whatsapp गटावर शेअर करण्यात येईल.


ब) जिल्हास्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप

१. राज्यस्तरीय online बैठकीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), DIET प्राचार्य व जिल्हा नोडल अधिकारी, ICDS विभाग प्रतिनिधी यांनी वेळेत उपस्थित रहावे.

२. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना शाळापूर्व तयारी अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर पत्र तातडीने निर्गमित करावेत.

३. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय यंत्रणेची online बैठक आयोजित करून सर्वांना शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उत्साहात आयोजन करणे व शाळापूर्व तयारी मेळाव्यास भेटी देण्याबाबत सूचना द्याव्यात.

४. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र. १ व २ चे नियोजन करावे.

५. विहित कालावधीत जिल्हा ते केंद्र स्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळामध्ये शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ व २ साठी उपस्थित राहतील यासाठी नियोजन करावे.

६. उपस्थित पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांनी राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर शाळास्तरावरील पहिल्या मेळावा भेटी संदर्भातील माहितीची नोंद घ्यावी.

शाळा परिसरातील माता पालक यांचे मार्फत बालकांच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेवून व त्याचे निरीक्षणाची नोंद दुसऱ्या मेळाव्याच्या वेळी नमुना आधारित मूल्यांकन (SBA) 7-10 दाखलपात्र मुलांची विकासपत्र मधील पहिल्या मेळाव्याची आणि दुसऱ्या मेळाव्याची माहितीची नोंद अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या नोंदी भराव्यात.

मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना शाळापूर्वतयारीअभियान२०२६ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.जिल्ह्यातील शाळापूर्व तयारी अभियान २०२६ - २७ पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे मार्फत प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.



क) शाळा स्तरावरील अंमलबजावणीचे स्वरूप

मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

शाळास्तरावर दि. २७ एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ चे आयोजन करण्यात यावे. त्याप्रमाणे सात टेबल व आवश्यक साहित्यासह मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.शाळास्तरावरील मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरावरील शिक्षणक्षेत्रातील अधिकारी यांना प्रत्यक्ष शाळेवर शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे.दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन विकास पत्राची प्रिंट किंवा झेरोक्स काढाव्यात. प्रत्यक्ष मेळाव्याच्या वेळी दाखल पात्र बालकांची विकासपत्रातील सर्व विकासाची स्थिती नोंदवून पालकांकडे देण्यात यावे.

उपक्रमाच्या अनुषंगाने यापूर्वी अंमलबजावणी केल्यानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. शाळास्तरावर व परिसरातील उपलब्ध साधनांचा मेळाव्यामधील ७ स्टॉल्ससाठी वापर करण्यात यावा. पहिल्या मेळाव्यानंतर दाखलपात्र बालकांच्या मातांचे वाडी - वस्तीनिहाय माता-पालक गट तयार करावेत. यासाठी यापूर्वी निपूण अंतर्गत तयार केलेल्या माता पालक गटातील सक्रीय लीडर मातांना देखील सहभागी करून घेण्यात यावे.

यावर्षी शाळापूर्व तयारी अभियान बदललेले स्वरूप जाणून घेण्यासाठी सोबत व्हिडिओचा QR code देण्यात आलेला आहे. तो काळजीपूर्वक पहावा.SCERT च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट या गटांना WhatsApp समूहाद्वारे आठवड्याच्या सुरुवातीला पाठविण्यात यावेत.

प्रत्येक माता पालक गटातील लीडर मातेस संबंधित गटाचे सोयीनुसार आठवड्यातून किमान एक तास एकत्र येऊन आठवड्यासाठी दिलेल्या साप्ताहिक आयडिया व्हिडिओ आणि अॅक्टिव्ह वर्कशीट पाहून गटात चर्चा करण्यात यावी.दोन्ही मेळाव्यादरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक / माता यांनी आयडिया व्हिडिओ व अॅक्टिव्ह वर्कशीट मदतीने साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी आपल्या पाल्यांकडून करून घ्याव्यात.शाळास्तरावर दि. १५ जून ते २० जून २०२६ दरम्यान कोणत्याही एका तारखेस शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करण्यात यावे.

शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या वापर करण्यात यावा. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना शाळापूर्वतयारीअभियान२०२६ या हॅशटॅगचा (# ) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

दुसरा मेळावा झाल्यावर पहिलीत दाखलपात्र बालकांच्या मातांना निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कार्यरत माता पालक गटांमध्ये समावेश करून माता गटांची पुनर्बांधणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी करण्यात यावी.करिता आपल्या स्तरावरून आपले अधिनस्त कार्यालयास या अभियानाची वरीलप्रमाणे अंमलबजावणी करण्याविषयी सूचित करण्यात यावे.


 महत्व 

  1. शिक्षणासाठी मजबूत पाया तयार होतो
    बालकांना शाळेत जाण्यापूर्वीच मूलभूत कौशल्यांची (भाषा, गणित, सामाजिक वर्तन) ओळख होते.

  2. शाळेत प्रवेश सुलभ होतो
    पहिलीत प्रवेश घेताना मुलांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते.

  3. पालकांचा सक्रिय सहभाग वाढतो
    शिक्षण प्रक्रियेत पालक प्रत्यक्ष सहभागी होतात, ज्यामुळे घर आणि शाळा यामध्ये समन्वय वाढतो.

  4. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी
    पुढील वर्गांतील अध्ययन सुलभ व प्रभावी होते.

  5. शाळा व समुदाय यांचा संबंध मजबूत होतो
    शाळा, अंगणवाडी आणि गावातील लोक यांच्यात सहकार्य वाढते.

 फायदे 

  1. मुलांचा सर्वांगीण विकास

    • बौद्धिक (thinking skills)

    • सामाजिक (वर्तन, संवाद)

    • शारीरिक (हाताळणी कौशल्य)

    • भावनिक विकास

  2. आत्मविश्वास वाढतो
    मुलांना शाळेत बोलणे, खेळणे, शिकणे याबाबत आत्मविश्वास मिळतो.

  3. शिकण्याची आवड निर्माण होते
    खेळ, कृती व उपक्रमांद्वारे शिकण्याची गोडी लागते.

  4. ड्रॉपआउट (शाळा सोडण्याचे प्रमाण) कमी होते
    सुरुवातीपासूनच मुलांची शाळेशी जुळवणूक झाल्यामुळे शिक्षणात सातत्य राहते.

  5. मूल्यमापन सुलभ होते
    विकासपत्र व SBA द्वारे मुलांची प्रगती ओळखणे सोपे जाते.

  6. शिक्षकांना नियोजन सोपे होते
    मुलांची पूर्वतयारी माहित असल्याने अध्यापन अधिक प्रभावी करता येते.

  7. घरगुती शिक्षणाला चालना मिळते
    पालक घरीच मुलांना शिकवू शकतात, त्यामुळे सतत शिक्षण चालू राहते.


राज्यातील शाळांमध्ये चित्रपट / लघुपट / नाटक / अनुषंगिक ई-शैक्षणिक साहित्य दाखविण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत


शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.


राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत


 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.