सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत
शासनाने प्रकाशित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिकामध्ये (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती बाबत खालील प्रकारे सूचना दिल्या आहेत...
शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या नाव, आडनाव, जात / पोटजात व जन्मतारीख यात बदल करण्याबाबतचे नियम व पद्धती जन्मतारीख शाळेच्या अभिलेखातील विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, जात, पोटजात, इत्यादींसारख्या नोंदीत दुरुस्त्या करण्याबाबत विभागाकडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या पद्धतीत एकरूपता असावी म्हणून खालील सूचना देत आहेत.
(१) सर्वसाधारण नोंदवहीत एकदा केलेल्या नोंदीत यथास्थिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बदल करता येणार नाही. ज्या ठिकाणी अशी पूर्वमान्यता घेतली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख त्यांच्या सहीनिशी तांबड्या शाईने मान्यता दिलेला बदल नोंदवहीतील व शेऱ्याच्या स्तंभात किंवा योग्य ठिकाणी बदल करण्यास परवानगी दिलेल्या प्राधिकाऱ्यांच्या पत्राचा क्रमांक व दिनांक नमूद करतील.
(२) सर्वसाधारण नोंदवहीतील किंवा यथास्थिती शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील नोंदीत बदल करण्याबाबतचा अर्ज या कारणाकरिता विहित केलेल्या नमुन्यात विद्यार्थी जर अज्ञान असेल तर त्यांच्या / तिच्या आई-वडिलांनी/पालकांनी किंवा विद्यार्थी जर सज्ञान असेल तर त्याने/तिने स्वतः ज्या शाळेत विद्यार्थी शिकत असेल त्या शाळेच्या प्रमुखामार्फत शाळा ज्यांच्या अधिकारितेत येत असेल त्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा यथास्थिती संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला पाहिजे.
(३) या नियमात तरतूद केलेल्या मर्यादेशिवाय इतर कोणत्याही बाबतीत विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतर शाळेच्या अभिलेखात नोंदविलेल्या जन्मतारखेत बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी सर्वसाधारण नोंदवहीतून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांत नक्कल करताना चूक झालेली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख इच्छित बदल प्रमाणपत्रात न करता प्रमाणपत्राच्या मागील बाजूस नोंद आणि नोंदीवर सही करून दिनांक टाकील. तसेच त्याचा शिक्का (रबर स्टॅम्प) उमटवील. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित शाळाप्रमुखपृष्ठां केलेल्या नोंदीनुसार माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रात झालेली वर्णलेखनातील चूक किंवा खरीखुरी चूक दुरुस्त करण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्रपणे विचार करील.
टीप - परिशिष्ट अठरामधील तरतुदीनुसार सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी त्या केल्यानंतर आई-वडिलांनी/पालकांनी साक्षांकित कराव्या लागतात. या नोंदीची जाणीव आई-वडिलांना/पालकांना करून दिल्यानंतर त्यांचे साक्षांकन घेतले असल्याची शाळाप्रमुखाने खात्री करून घेतली पाहिजे. शाळाप्रमुखाने प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याच्या प्रगतीपुस्तकात किंवा दिनदर्शिकेत केली पाहिजे व तिच्यावर विदयार्थ्यांच्या आईवडिलांची/पालकांची सही घेतली पाहिजे.
(४) अनुज्ञेय बदल किंवा दुरुस्ती करण्याकरिता शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याकडून किंवा ज्याने शाळा सोडली आहे अशा विदयार्थ्याकडून आलेल्या अर्जाबरोबर कोणतीही फी आकारली जाणार नाही.
(५) अर्ज पुढे पाठविताना शाळाप्रमुखाने अर्जावरील सही पालकाने/आईवडिलांनी किंवा विदयार्थी जर सज्ञान असेल तर त्याने स्वतः केलेली असल्याची व अशा अधिकृत व्यक्तीनेच अर्ज केला असल्याची पडताळणी केली पाहिजे.
जन्मतारखेतील बदल
(६) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना क्रमांक १ मध्ये अर्ज सादर केला पाहिजे. त्यामध्ये चुकीची नोंद कशी झाली याबाबतीत स्पष्टपणे स्पष्टीकरण करण्यात यावे.
(७) सुचविलेल्या बदलाच्या पुष्ट्यर्थ खालील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे. -
(एक) जन्मनोंदवहीतील प्रमाणित उतार.
(दोन) लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.
(तीन) ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत; आणि
(चार) विद्यार्थ्यांच्या खऱ्या जन्मतारखेबाबत वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यासमोर
विदयार्थ्याच्या आईवडिलांनी किंवा पालकाने केलेले शपथपत्र; आणि
( पाच ) असल्यास, अन्य कोणताही कागदोपत्री पुरावा
(८) दाखल केलेला कागदोपत्री पुरावा त्या मुलाची व आईवडिलांची स्पष्टपणे ओळख पटवणारा असल्याशिवाय आणि खरोखरीच चूक झाली आहे याबाबत कोणतीही शंका राहिली नाही अशा स्वरूपाचा असल्याशिवाय जन्मतारखेत कोणताही बदल करण्यास मंजुरी देऊ नये. बदल मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी तो मंजूर करण्याची कारणे लेखी नमूद करून ठेवली पाहिजेत.
नाव व आडनावातील बदल
(९) नावातील बदलांकरिता अर्जासोबत पुढील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे आणि पुढील पुराव्याची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय आणि त्याबाबत खात्री करून घेतल्याशिवाय कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाऊ नये.
(अ) दत्तविधानामुळे बदल झाला असेल तर त्याबाबतीत दत्तकपत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तकपत्राची प्रमाणित प्रत किंवा दत्तविधानामुळे नावामध्ये बदल झाला आहे हे दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
(ब) विवाहामुळे बदल झाला असेल तर आईवडिलांचे किंवा पालकांचे व मुलींचे स्वतःचे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.
(क) अन्य सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकाने वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांपुढे केलेले शपथपत्र.
(१०) सार्वजनिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याच्या बाबतीत नावातील बदल मंजूर
झाला असल्यास त्याने/तिने आपल्या नावातील बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे. मात्र विवाहामुळे नावात झालेला बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक नाही
(११) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना क्र. २ मध्ये अर्ज सादर केला पाहिजे.
जात किंवा पोटजात यामधील बदल
(केवळ मागासवर्गीय विदयार्थ्याच्या बाबतीत)
(१२) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा पोट जातीत बदल करण्याकरिता
विद्यार्थ्याच्या पालकाने ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना ३ मध्ये अर्ज केला पाहिजे.
(१३) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील सर्वसाधारण नोंदवहीतील "जात" किंवा "पोटजात" या बाबतीतील नोंदीत पुढील परिस्थितीत बदल करण्यास परवानगी देता येईल :-
(एक) सुरवातीलाच चुकीची नोंद केल्यामुळे.
(दोन) धर्मात बदल झाल्यामुळे.
( तीन ) ती जात पूर्वी मागासवर्गीयेतर म्हणून समजली जात असेल व नंतर ती शासनाने मागासवर्गीय म्हणून घोषित केल्यामुळे किंवा ह्याउलट झाल्यामुळे
(चार) दत्तविधानामुळे
( पाच ) आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहामुळे
(सहा) अन्य कोणत्याही कारणामुळे
(१४) ह्या प्रयोजनासाठी जातीतील किंवा पोटजातीतील बदल करण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पुढील प्राधिकाऱ्यांनी दिलेले आवश्यक ते प्रमाणपत्र दाखल केले पाहिजे.
बृहन्मुंबई
(अ) वरील (एक), (दोन) आणि (तीन) मध्ये दिलेल्या कारणाकरिता-
(अ) मुख्य इलाखा दंडाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला इलाखा दंडाधिकारी किंवा
(ब) जस्टिस ऑफ पीस, किंवा
(क) समाजकल्याण अधिकारी, बृहन्मुंबई, मुंबई
अन्य क्षेत्रात :
(ड) जिल्हादंडाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी, किंवा
(ई) मानसेवी दंडाधिकारी किंवा
(फ) संबंधित जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी
(ब) दत्तविधानामुळे - जातीतील किंवा पोटजातीतील बदल करवून घेण्याकरिता
करावयाच्या अर्जासोबत दत्तकपत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तकपत्राची प्रमाणित प्रत किंवा दत्तकविधानामुळे नावात (कोणताही असल्यास) आणि जातीतील किंवा पोटजातीतील झालेला बदल दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडले पाहिजे.
(क) आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहामुळे जातीतील किंवा पोटजातीतील
बदल करवून घेण्याकरिता करावयाच्या अर्जासोबत, आईवडिलांचे किंवा पालकांचे आणि स्वतः विद्यार्थ्यांचे / विद्यार्थिनीचे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आणि विवाहामुळे जातीत किंवा पोटजातीत बदल झाला आहे हे दर्शविणारे वरील (अ) मध्ये नमूद केलेल्या संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडले पाहिजे.
टीप - “मागासवर्ग” या संज्ञेचा अर्थ पुढील प्रकारच्या जाती-जमाती व त्यामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो :-
१) अनुसूचित जाती आणि
बुद्धधर्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील
२) अनुसूचित जमाती मुंबई पुनर्रचना अधिनियम, १९६० च्या सातव्या व आठव्या अनुसूचीचा भाग
७- अ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी स्वीकृत केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या यादयांविषयीचा फेरबदल आदेश, १९५६ आणि शासनाने याबाबतीत वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार
(३) विमुक्त व भटक्या जमाती
(४) इतर मागासवर्गीय
शासन निर्णय, शिक्षण व समाज कल्याण विभाग, क्र. सीबीसी - १३६१ एम,
दिनांक २१ नोव्हेंबर १९६१ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार
शासनाने वेळोवेळी मागासवर्गीय म्हणून घोषित केलेल्या जाती
(१५) बदलास मंजुरी न दिलेल्या यथास्थिती शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध करावयाचे अपील, आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित उपसंचालकाकडे सादर केले पाहिजे. (शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. जीएसी - १०८३/८९ - एसई - २, दिनांक १६ मार्च, १९८३)
जळगाव प्राथमिक शिक्षण विभागाने जनरल रजिस्टर नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत....
माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्म दिनांक, नांव / आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे. त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
• जन्मदिनांक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांची स्पष्ट शिफारस करावी.)
२. जन्म नोंदवहीतील प्रमाणित उतारा
३. लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत
४. खिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रत
५. विद्यार्थ्याच्या ख-या जन्मतारखेबाबत वृतिधारी दंडाधिका-यासमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलानी किवा पालकाने केलेले शपथपत्र
६. नोंदवहीतील उतारा (जनरलरजिस्टर) प्रमाणित प्रत .
• नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक) यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. दत्तक विधानामुळे बदल असलेस त्याबाबत दत्तक पत्राची प्रमाणित केलेली प्रत
३. विवाहामुळे बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
४. आई वडील (पालक) यानी वृत्तिधारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञा पत्र
५. महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूची
६. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर उतारा ) प्रमाणित प्रत..
7. फारकत (Divorce) होवुन पुन्हा लग्न झालेले असल्यास वडीलांचे नांव लावणेसाठीचा अधिकृत पुरावा
• जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना ३ विहित नमुन्यातील अर्ज ३ (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जातीचा दाखला (जिल्हादंडाधिकारी किंवा त्यानी प्रधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी, मानवसेवा दंडाधिकारी किवा समाजकल्याण अधिकारी)
३. आईवडील (पालक) यानी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञा पत्र
४. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर) प्रमाणित प्रत.
५.फारकत होवुन (Divorce) पुन्हा अंतरजातीय विवाह झाल्यास जात व पोटजातीमध्ये बदल करण्याबाबत पालकाचे जातीचे प्रमाणपत्र
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार
सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल | रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नांव / आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे. त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
जन्मदिनांक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जन्म नोंदवहीतील प्रमाणित उतारा
३. लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत
४. ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रत
५. विद्यार्थ्याच्या ख-या जन्मतारखेबाबत वृतिधारी दंडाधिका-यासमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलानी किवा पालकाने केलेले शपथपत्र .
६. नोंदवहीतील उतारा (जनरलरजिस्टर) प्रमाणित प्रत .
नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज
यांनी स्पष्ट शिफारस करावी.(मुख्याध्यापक )
२. दत्तक विधानामुळे बदल असलेस त्याबाबत दत्तक पत्राची प्रमाणित केलेली प्रत
३. विवाहामुळे बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
४.आई वडीलानी (पालक) यानी वृत्तिधारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
५. महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूची
६. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर उतारा ) प्रमाणित प्रत .
जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना ३ विहित नमुन्यातील अर्ज
(मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जातीचा दाखला (जिल्हादंडाधिकारी किंवा त्यानी प्रधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी. मानवसेवा दंडाधिकारी किवा समाजकल्याण अधिकारी )
३. आईवडीलानी (पालक) यानी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
४. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर) प्रमाणित प्रत .
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .