समग्र शिक्षा व पीएम श्री अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

समग्र शिक्षा व पीएम श्री अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.


परिपत्रक दि 12 मे २०२६ नुसार शासनाने निर्देश दिले आहेत कि......

१. प्रस्तावना:- सन २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहेत.

पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे ही संस्था करते. सदर पाठयपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु, सिंधी अरेबी, तामिळ व बंगाली माध्यमातील पाठयपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या मे. शिरिष कार्गो सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या वाहतूकदारांकडून बालभारती गोडाऊन ते तालुका स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.


२. पाठ्यपुस्तक योजनेचे आर्थिक निकष :

२.१) या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या " शिरीष कार्गो सर्व्हिसेस प्रा. लि., मुंबई या वाहतूकदाराकडून, विभागीय बालभारती पाठयपुस्तके भांडार ते तालुकास्तरापर्यंत पाठयपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

२. २) बालभारती गोडाऊन ते तालुका स्तरापर्यंत पाठयपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च राज्य स्तरावरून अदायगी करण्यात येईल.

२.३) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठयपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तद्नुषंगिक खर्च (पुस्तके चढाई व उतराई, हमाली खर्च इ.) संबंधित जिल्हा / तालुकास्तरावरून सर्व वित्तीय नियमांचे पालन करून निविदा प्रक्रियेद्वारे करावी व त्या वाहतूकीचा दर हा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदूळ वाहतूकीच्या दराप्रमाणे म्हणजेच प्रती किग्रॅ रु. १.५०/- चे मर्यादेतच करण्याची दक्षता घेण्यात यावी. प्रती किग्रॅ रु. १.५० /- पेक्षा जास्त वाहतूक दर मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

२.४) सन २०२६ २७ ची तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तकांची वाहतूक व तद्नुषंगिक खर्चाची देयके सन २०२६ २७ याच आर्थिक वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या लेखाशिर्षाखाली निकाली काढण्यात यावी. सदर देयकांच्या अदायगी, पुढील आर्थिक वर्षात अनुज्ञेय राहणार नाही. याबाबतच्या खर्चाची माहिती या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये या कार्यालयास माहे जुलै २०२६ अखेरपर्यंत पाठविण्यात यावीत. सदर प्रमाणपत्रे सादर करण्यास कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.


पाठयपुस्तकांची मागणी व वाहतूक :

३.१) सन २०२६-२७ साठी पाठयपुस्तकांची मागणी पाठयपुस्तक मंडळाकडे ऑनलाईन

पद्धतीने यापूर्वीच करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संख्येपेक्षा जादा पाठयपुस्तकांच्या

देयकांची अदायगी केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

३.२) सन २०२६-२७ मध्ये विभागीय बालभारती पाठयपुस्तके भांडार (गोदाम) ते

तालुकास्तरापर्यंतची वाहतूक राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे.

३.३) पाठयपुस्तके शाळांना पोहोच केल्यानंतर याबाबतच्या बालभारतीच्या सर्व पोहोच पावत्या व खर्चाची देयके संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद यांचेकडे एका महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

३.४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व तसेच शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व यांनी पोहोच पावत्या व झालेल्या खर्चाचे देयके प्रति स्वाक्षरीत करून वाहतूकदारांची देयके त्याच आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२६-२७ मध्ये तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी. सदर वाहतूकीसाठी, वाहतूकीपूर्वी कोणत्याही स्वरूपाचे अग्रीम अनुज्ञेय नाही, याची नोंद घ्यावी.


पाठयपुस्तके वितरणाची कार्यवाही :

४. १) शाळा सुरु होण्यापूर्वी, विद्यार्थ्याचे पालक, विद्यार्थ्यांसाठी पाठयपुस्तके खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा व पीएम श्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, याबाबतची पूर्वसूचना ठळक अक्षरात शाळेच्या दर्शनी भागावर व सर्वाना दिसेल अशा ठिकाणी फलकावर (Board) वर लिहिण्यात यावी. मराठी शिवाय इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यमानुसार अन्य भाषेत देखील सदर सूचना लिहिण्यात यावी. आपल्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभासद,माता पालक संघ यांची एकत्रितपणे सभा घेऊन, मोफत पाठयपुस्तक योजना व वितरणाबाबतची माहिती देण्यात यावी. पालकांना आपल्या वास्तव्याच्या परिसरात व त्यांचे कार्यक्षेत्रात सदर माहितीचा प्रसार करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

४. २) याकरीता शक्य झाल्यास मोफत पाठ्यपुस्तके योजनेबाबत, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रसार माध्यमांचे सहकार्य घेऊन सदर उपक्रमाच्या अनुषंगाने विनामूल्य प्रसिद्धी द्यावी. ४.३) कोणत्याही विनाअनुदानित शाळेस सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही, याची नोंद घ्यावी.पाठयपुस्तकांचा पुरवठा

५. १) तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत व संबंधित शाळांकडे विनाविलंब वितरण करण्यात यावेत. पाठ्यपुस्तकांच्या वर्गीकरणाची जबाबदारी गटसमन्वयकांचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी व समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे काम सांभाळणारे तालुकास्तरावरील कर्मचारी यांनी यांची राहील.

५. २) शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठयपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय वर्गनिहाय,

माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदरचा पाठयपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन (Book Day) म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्हयात शाळा सुरु होण्याच्या दिवशी पाठयपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात याव्यात.

५.३) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचा पुरवठा होईल यांचे नियोजन करून वेळापत्रकाची एक प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.

५.४) विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावर, त्यांच्या विभागातील जिल्हयांची व महानगरपालिकांची पाठ्यपुस्तकांची मागणी पुरवठा आणि वितरण याबाबतचे पंचायत समिती तसेच, शाळा निहाय नियोजन करण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक), महानगरपालिकांचे, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित करावी. नियोजन करताना सभेच्या वेळी पाठयपुस्तकांच्या संबंधित भांडार प्रमुखांनाही आमंत्रित करावे जेणेकरून पाठयपुस्तकांच्या पुरवठयामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत.

५.५) पाठयपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी, शाळा / पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात

याव्यात.

५.६) पाठयपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी लिहीतांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खाडाखोड होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.



पाठयपुस्तकाची साठवणूक :

६. १) ज्या जागेवर पुस्तके उतरावयाची आहेत, ती जागा निश्चित करताना सदरची जागा प्रशस्त असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. पुस्तकांचे वाटप पंचायत समिती / वार्डातून करावयाचे असल्याने पुस्तकांचे वर्गीकरण करुन त्यांच्या थण्या रचता येतील याची खातरजमा करण्यात यावी. सदरची जागा सुस्थितीत / सुरक्षित असावी. पुस्तके पुरवठा करण्यापूर्वीचा काळ पावसाळयाची सुरुवात होण्याचा काळ असल्याने पाऊस आल्यास पुस्तके भिजणार नाहीत याची दक्षता घेऊन पुस्तके उतरविण्यात यावीत. त्याबाबतची आवश्यक व्यवस्था आधीच करावी.

६. २) पंचायत समिती स्तरावरून शाळांना पुस्तकांचे वाटप करावयाचे आहे. याकरीता, पुस्तके ट्रकमध्ये चढवणे आणि उतरवून देणे यासाठी ट्रक येऊ शकेल एवढा मोठा रस्ता निश्चित केलेल्या जागेपर्यंत उपलब्ध असावा, जेणेकरुन हमाल मजूरांना पुस्तकाचे गठ्ठे लांबच्या पल्ल्यापर्यंत वाहून नेण्याची गरज पडणार नाही. तसेच पाठयपुस्तके उतरवून

घेण्याची जागा ही तळमजल्यावर असावी याची दक्षता घ्यावी. पाठयपुस्तके गाडीतून उतरविण्यासाठी गरज पडल्यास काम रात्रीच्या वेळी करावे लागेल म्हणून विजेची व्यवस्था असणे आवश्यक राहील.

पाठयपुस्तके वाटपाचे वेळापत्रक



७.१) सर्व पुस्तके माध्यमनिहाय, इयत्ता निहाय आणि पंचायत समितीनिहाय वेगळी करण्यात यावीत आणि ती ठराविक दिवशी संबंधित पंचायत समितीला / वार्डाला वेळेत पोहचविण्यात यावीत.

७.२) पुस्तकाचे वाटप करण्यासाठी पुढील स्वरूपात वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. जेणेकरून त्या स्तरावर पुस्तके उतरवण्यास अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील व वेळेचा अपव्यय होणार नाही. पाठयपुस्तके जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी सात दिवस अगोदर शाळास्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.दि. १५/०६/२०२६

८. १) पुस्तके प्राप्त होण्यापूर्वीच कोणत्या जागी पुस्तके उतरावयाची आहेत. हे त्या स्तरावर प्रत्यक्षपणे जागेस भेट देऊन निश्चित करावे. ही जागा निवडताना सुद्धा वर नमूद केलेल्या सूचनाचे पालन करावे त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती / वार्ड स्तरावर कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमाची आणि कोणत्या इयत्तेची किती पुस्तकांची आवश्यकता आहे याबाबतचा तपशिल तयार करावा जेणेकरुन वाटप सोयीचे होईल.

८.२) पंचायत समिती स्तरावर त्यांना प्राप्त झालेल्या पुस्तकांची मोजणी करून आवश्यक तेवढी पुस्तके प्राप्त झाली किंवा नाही याची खातरजमा करावी.

८.३) पुस्तके कमी-अधिक असल्यास तात्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यास कळवावे.

८.४) प्राप्त पुस्तकांचे इयत्तानिहाय माध्यमनिहाय आणि शाळानिहाय वर्गीकरण करण्यात

यावे.

८.५) ज्या शाळांसाठी जी जागा निश्चित केली असेल त्याच ठिकाणी ती पुस्तके ठेवण्यात

यावी.

८.६) पुस्तकांचे वाटपाचे नोंद रजिस्टर, पंचायत समिती / वार्ड स्तरावर ठेवावे व पुस्तके प्राप्त

झाल्यावर त्यावर मुख्याध्यापकांची व त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी. सदर नोंद रजिस्टरची पडताळणी नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी करावी.

८.७) पाठ्यपुस्तके वाटपाचे नोंद रजिस्टरमध्ये कोणत्याही स्वरुपात खाडाखोड होणार नाही

याची दक्षता घेण्यात यावी.मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा रजिस्टर प्रपत्राचा नमूना


पुस्तकांचे विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक वितरण :

९. १) प्रथम सत्राच्या ज्या दिवशी शाळा सुरु होईल त्या दिवशी, सर्व विद्यार्थ्याना पाठयपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापक करतील.

९. २) पुस्तके वितरणाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता- पालक संघ, संस्थेचे पदाधिकारी आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक यांना उपस्थित

राहण्याबाबत मुख्याध्यापकानी निमंत्रित करावे आणि त्यांचे उपस्थित समारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे.

९.३) पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत न आल्यास ज्या दिवशी विद्यार्थी प्रथमतः शाळेत

येईल त्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात यावीत. तसेच नंतर जस जसे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तसतसे प्रवेशाच्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात यावीत.

९.४) समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता असलेल्या निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाहय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास, सदर विद्यार्थ्यास शिल्लक असलेल्या पाठयपुस्तकांमधून, पाठयपुस्तके देण्यात यावीत. पुस्तके उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून, शाळाबाहय विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.


(१०) पाठयपुस्तके वितरणाचा अहवाल सादर करणे :

१०. १) पुस्तकांचे वितरण झाल्यानंतर पुस्तके वितरणाचा अहवाल शाळांनी पंचायत समिती,

पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदांना व जिल्हा परिषदांनी / महानगरपालिकांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास शाळा सुरु झाल्यानंतर सात दिवसात पाठवावा. सदर माहिती शासनास सादर करावयाची असल्याने उपरोक्त अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

१०.२) शाळेत पहिल्या दिवसापासून पुढील आठ दिवसातील पाठयपुस्तकांच्या वाटपाचा आढावा घेण्यात यावा. विद्यार्थी संख्या आणि वाटप यात तफावत दिसून आल्यास, त्याचप्रमाणे काही शाळांत काही इयत्तांची पाठ्यपुस्तके अधिक तर काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता दिसून आल्यास, जिल्हा परिषद, क्षेत्रात केंद्रप्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांनी, तर नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात त्यांचे वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकारी यांनी आढावा घेतल्यानंतर जास्त पुस्तके असलेल्या शाळांतून कमी पुस्तके असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती / महानगरपालिकेला कळविण्यात यावा.

१०. ३) पाठयपुस्तके आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा घनिष्ठ संबंध आहे. सदर बाब लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही अत्यंत दक्षतेने पार पाडणे आवश्यक आहे.



उपरोक्त उद्दिष्ट साध्य करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी असेल. यात

कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य पालनात गंभीर कसूर केल्याचे मानण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

क्षेत्रीय भेटी दरम्यान मोफत पाठ्यपुस्तके योजनेची अंमलबजावणी, समग्र शिक्षा अंमलबजावणी आराखडयातील मार्गदर्शक सूचनानुसार तसेच राज्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शाळा स्तरावरून होत आहे याची खात्री करण्यात येईल. मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा स्तरावरून सर्व निकष पात्र लाभार्थ्यांना पाठयपुस्तकांचा लाभ देणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तक योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर योजनेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्न तसेच लेखा आक्षेप उपस्थित होणार नाहीत. याबाबतची दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी.



राज्यातील शाळांमध्ये चित्रपट / लघुपट / नाटक / अनुषंगिक ई-शैक्षणिक साहित्य दाखविण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत


शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.


राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.