राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका बाबत
राज्य निवडणूक आयोगाने दि २९ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार........
राज्य निवडणूक आयोगाचे दि. १३/ ०१ / २०२६ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी दि. २७/०१/२०२६ रोजी उमेदवारी मागे घेणे आणि चिन्ह वाटपानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदान, मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द करण हे टप्पे पार पडणे शिल्लक आहेत.
२. मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. १२/०१/२०२६ रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. ३१/०१/२०२६ च्या पुढे २ आठवड्यांची मुदत दिलेली आहे. मात्र, दि.२८/०१/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने संदर्भाधीन अ. क्र. ३ समोरील दि. २८/०१/२०२६ रोजीच्या बिनतारी संदेशान्वये राज्यात दि.२८/०१/२०२६ ते दि. ३०/०१/२०२६ पर्यंत राज्य स्तरावरील दुखवटा जाहीर केला आहे.
३.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उपरोक्त परिच्छेदातील नमूद कालावधीमध्ये प्रचार करणे सोयीचे होणार नसल्याने परिणामी मतदान व मतमोजणी इ. निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या दिनांकास पार पाडणे शक्य होणार नाही.
४.उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ तसेच महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ यामधील अनुक्रमे नियम ११ (२अ) आणि नियम १३(३) मधील तरतुदीनुसार १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा परिच्छेद १ मध्ये नमूद केलेल्या उर्वरित टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम नव्याने देणे आवश्यक झाले आहे.
५. तरी यासोबतच्या परिशिष्ट - १ नुसार सुधारीत निवडणूक कार्यक्रम देण्यात येत असून जिल्हाधिकारी यांनी सदर निवडणूक कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सुचना दि. ३१/०१/२०२६ रोजी प्रसिध्द करून सदर कार्यक्रमास आवश्यकतेनुसार व नियमाप्रमाणे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
६.निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु असून निवडणुकीचा निकाल घोषित होइपर्यंत अंमलात राहील. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दि. १३/०१/२०२६ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे जिल्हाधिकारी यांनी पालन करावे.
सदरचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहिती साठी पाहू शकता.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .