राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत.
शासन निर्णय दि 27 जानेवारी २०२६ च्या नवीन निर्णयनुसार.....
राज्यातील खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित/विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतचा संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय व या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
१. व्याप्ती :
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व अनुदानित व अंशत: अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीची सुधारीत योजना लागू राहील. तथापि, स्वंय अर्थसहाय्यीत तत्वावर स्थापन झालेल्या तसेच विनाअनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही.
२. उदिष्ट :
सेवेत कार्यरत असताना खाजगी अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना मानवतावादी दृष्टीकोनातून आधार देण्यासाठी कुटुंबातील पात्र सदस्यास त्यांनी धारण केलेल्या अर्हतेनुसार गट-क अथवा गट ड मधील सरळसेवेच्या कोटयातील संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या रिक्त पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देणे.
३. स्वरुप :
अ) योजना कोणास लागू आहे :
खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकासह शिक्षक ब शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास ही योजना लागू राहील.
दिवंगत कर्मचाऱ्याचा पती / पत्नी शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत अथवा कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये अथवा अशा कोणत्याही सेवेत ज्यात त्याचे वेतन व भत्ते शासनाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अदा केले जातात अशा सेवेत कार्यरत असल्यास अनुकंपा नियुक्तीचा लाभ त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास अनुज्ञेय राहणार नाहीत.
दि. ३१.१२.२००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
ब) अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे
I. खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील नियमित शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवेत कार्यरत असतांना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
II.सेवेत कार्यरत असताना बेपत्ता झालेल्या नियमित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचान्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
क) कोणत्या पदावर नियुक्ती अनुज्ञेय आहे :
I.खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील गट-क व गट-ड मधील रु. ३८६००- १२२८०० ( एस-१४) पर्यंतच्या मुळ वेतनश्रेणीतील सरळ सेवेच्या कोटयातील जी पदे संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त आहेत अशा पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.
संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी शाळांतील चतुर्थश्रेणी (गट-ड) संवर्गातील पदे व्यपगत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे अशा व्यपगत झालेल्या पदांवर अनुकंपा नियुक्ती देता येणार नाही. तथापि, ज्या पदांवर नियमित चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत, अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ते पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये. पद रिक्त झाल्यापासून ते शैक्षणिक वर्षाची अखेर या कालावधीत त्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा दावा करणारा उमेदवार प्रतिक्षा यादीत असल्यास अशा उमेदवारास ज्येष्ठता क्रमानुसार चतुर्थश्रेणी (गट-ड संवर्गातील पदावर सदर पद व्यपगत न करता अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या पदावर अनुकंपा नियुक्तीने दावा करणारा उमेदवार प्रतिक्षा यादीत नसल्यास सदर पद व्यपगत होईल. शिक्षक संवर्गातील पदावर अनुकंपा नियुक्ती द्यावयाची असल्यास त्यासाठी थेट नियुक्ती न देता प्रचलित शिक्षण सेवक योजना लागू राहील. यासाठी संबंधित उमेदवारांने यथास्थिती शिक्षक पात्रता परिक्षेसह आवश्यक ती अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
ड) अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य :
दिवंगत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची आहे त्याने खालीलप्रमाणे इतर सदस्याचे ना हरकत प्रमाणपत्र या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मधील नमुन्यात देणे आवश्यक आहे.
इ) अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता :
दिवंगत कर्मचान्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यास अनुकंपा नियुक्ती द्यावयाची आहे त्याने खालीलप्रमाणे पात्रता धारण करणे आवश्यक आहे :
वयोमर्यादा:
किमान वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण
कमाल वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत
सेवाप्रवेश नियमात विहित केलेली अर्हता :
1. ज्या पदावर नियुक्ती द्यावयाची आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक व अन्य अर्हता धारण करणे आवश्यक राहील.
॥. पंरतु, दिबंगत कर्मचाऱ्याची पत्नी / पती शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत नसल्यास उपरोक्त परिच्छेद क्र. ३ (क) (II) मधील तरतूदींच्या अधीन राहून केवळ गट-ड मध्ये नेमणुकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्यात यावी. सदर सवलत केवळ दिवंगत कर्मचान्याच्या कायदेशीर पत्नी / पती या सदस्यांपुरती मर्यादित आहे. अन्य सदस्यांसाठी ही सवलत लागू राहणार नाही.
III. गट-क मधील ज्या सवंर्गाच्या सेवाप्रवेश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक केली असल्यास, अशा गट-क संवर्गातील पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
b. अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांने बंधनकारक असल्यास इतर नियमित नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे विहित मुदतीत संगणक हाताळणी प्रमाणपत्र, विहित करण्यात आलेले प्रशिक्षण व विहित करण्यात आलेल्या अन्य परिक्षा उत्तीर्ण होणे इत्यादी अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील.
v. उपरोक्त उप परिच्छेद क्र. ॥ मध्ये नमूद केल्याप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यकता असल्यास तसेच उपरोक्त उप परिच्छेद क्र. iv मध्ये नमूद अन्य अर्हता बंधनकारक केली असल्यास विहित मुदतीत अशी अर्हता धारण न करणाऱ्या अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचान्यास समान परिस्थितीतील नियमित कर्मचान्यांप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागेल.
कार्यपध्दती:
अ) कुटुंबास योजनेची माहिती देणे :
कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबास अनुकंपा योजनेची माहिती देणे, इच्छुकता पत्र भरुन घेणे व परिपूर्ण अर्जाचा नमुना देणे ही शाळा समितीची व संबंधित मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल. गट-क मधील कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे व त्यासाठी आवश्यक अर्हता काय आहे तसेच गट-ड मधील पदावरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता काय आहे याची संपूर्ण माहिती कुटुंबास देणे आवश्यक राहील.
कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर कुटुंब निवृत्तीवेतन अथवा अन्य अनुज्ञेय लाभ देण्याच्या अनुषंगाने त्याच्या कुटुंबाकडून आवश्यक कागदपत्रे भरुन घेत असताना त्याचवेळी त्यांना अनुकंपा योजनेची माहिती देण्यात यावी.
योजनेची माहिती देण्यात येते वेळीच त्यांच्याकडून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब येथील विहित नमुन्यात इच्छुकता पत्र भरुन घेण्यात यावे. तसेच इच्छुक नसल्यास तसे पत्र भरुन घेण्यात यावे. इच्छुकता पत्र भरुन घेतल्याची पोच पावती देण्यात यावी. शाळा समितीने व मुख्याध्यापकाने इच्छुकता पत्र भरुन घेतल्यानंतर
अशा इच्छुक उमेदवारांची यादी शाळा स्तरावर ठेवावी. प्रत्येक इच्छुकता पत्राची प्रत सात दिवसांच्या आत संबंधित मुख्याध्यापकाने सक्षम प्राधिकाऱ्याकडे पाठविणे आवश्यक राहील. सक्षम प्राधिकाऱ्याने प्राप्त झालेल्या इच्छुकता पत्रांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे आवश्यक राहील.
योजनेची माहिती देण्यात येते वेळीच या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-क येथील परिपूर्ण अर्जाचा नमुना कुटुंबास देणे व त्यांच्याकडून त्याबाबतची पोच पावती घेण्यात यावी.
ब) मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने करावयाची कार्यवाही :
कुटुंबातील जो पात्र सदस्य अनुकंपा नियुक्तीचा दावा करीत आहे, त्यांने या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-क येथील विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील. असा अर्ज दिवंगत कर्मचारी ज्या शाळेत कार्यरत होता, त्याच शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे करणे आवश्यक राहील. अर्जासोबत त्याने जन्म दिनांक व वय, शैक्षणिक व अन्य अर्हता, अधिवास, लागू असल्यास सामाजिक आरक्षणाच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक कागदपत्रे इत्यादी तपशिलवार माहिती जोडणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे परिच्छेद क्र. ३ (ड) मध्ये नमूद केल्यानुसार यथास्थिती कुटुंबातील इतर सदस्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जात उमेदवाराने त्याने धारण केलेल्या शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक व इतर अर्हतेनुसार गट-क मधील कोणत्या संवर्गातील पदावरील नियुक्तीसाठी तो दावा करीत आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. उमेदवारास त्याच्या अर्हतेनुसार गट-क मधील एका पेक्षा अधिक संवर्गातील पदावर दावा करता येईल. तथापि, गट-क मधील एका पदावर नियुक्ती झाल्यास अन्य पदावरील त्याचा दावा नियुक्तीच्या दिनांकास संपुष्टात येईल.
उमेदवारास गट-क अथवा गट-ड यापैकी केवळ एकाच गटात समाविष्ट असलेल्या संवर्गातील पदांवर दावा करता येईल. उमेदवारास गट-क व गट-ड अशा दोन्ही गटातील पदांसाठी दावा करता येणार नाही. तथापि, खालील परिच्छेद क्र. ४ (ड) मध्ये नमूद 'केल्याप्रमाणे उमेदवाराला गट बदलण्याची मुभा असेल.
कुटुंबाने इच्छुकता पत्र सादर केल्याच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या मुदतीत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे करणे आवश्यक राहील. विहित मुदतीत असा अर्ज प्राप्त न झाल्यास इच्छुकता यादीतून त्या कुटुंबाचे नाव वगळण्यात येईल. नाव वगळल्याबाबत संबंधित मुख्याध्यापकाने सक्षम प्राधिकाऱ्यास सात दिवसाच्या आत कळविणे बंधनकारक असेल.
दिवंगत कर्मचान्याच्या कुटुंबातील अज्ञान वारसदाराच्या बाबतीत त्यांच्यापैकी एकाने वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे अर्ज करणे आवश्यक राहील.
इच्छुकता पत्र सादर केल्याच्या दिनांकापासून ३ वर्षाच्या मुदतीत तसेच अज्ञान वारसदार सज्ञान झाल्यानंतर ३ वर्षाच्या मुदतीत अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक असले तरी शिक्षण संचालक (योजना) यांना २ वर्षे कालावधीपर्यंतचा अर्ज सादर करण्यासाठीचा विलंब क्षमापित करण्याचा अधिकार असेल. अर्थात परिपूर्ण अर्ज सादर करण्यास ३ वर्षे इतका पुरेसा कालावधी देऊन देखील विहित मुदतीत अर्ज करणे का शक्य झाले नाही याची कारणमिमांसा तपासून, विलंब हा अपरिहार्य कारणास्तव झाल्याचे आढळून आले तरच असा विलंब क्षमापित करता येईल.
शाळा व्यवस्थापनाने व सक्षम प्राधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही :
खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांच्या बाबतीत या योजनेच्या प्रयोजनार्थ जिल्हा हे एकक मानले जाईल. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांसाठी एका शिक्षण निरीक्षकाच्या अखत्यारीतील भू-भाग हे एक एकक मानले जाईल.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालक (योजना) यांना राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी म्हणून मान्यता देण्यात येत आहे. त्या त्या जिल्हयांचे शिक्षणाधिकारी (योजना) यांना तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी संबंधित शिक्षण निरीक्षक यांना या योजनेच्या प्रयोजनार्थ सक्षम प्राधिकारी म्हणून मान्यता देण्यात येत आहे. सक्षम प्राधिकान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा अभिलेख तात्काळ ताब्यात घेऊन पहिली व दुसरी प्रतिक्षासूची अद्ययावत करावी. एकाच व्यवस्थापनामार्फत एका जिल्हयात एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जात असतील तर अशा शाळा अनुकंपा नियुक्तीच्या प्रयोजनार्थ एक समूह मानल्या जातील. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एका शिक्षण निरीक्षकाच्या अखत्यारीतील भू-भागावर एकाच व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक शाळा चालविल्या जात असतील तर अशा शाळा अनुकंपा नियुक्तीच्या प्रयोजनार्थ एक समूह मानल्या जातील.
दिवंगत कर्मचान्याच्या पात्र वारसदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित मुख्याध्यापकांमार्फत शाळा व्यवस्थापनाकडे सादर केल्यानंतर व्यवस्थापनाने त्या अर्जाची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव वर उल्लेख करण्यात आलेल्या त्या त्या जिल्हयातील तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सक्षम प्राधिकान्याकडे पाठविणे आवश्यक राहील.
सक्षम प्राधिकाऱ्याने प्राप्त झालेल्या अर्जाची त्यांच्या स्तरावर छाननी करावी. छाननीअंती परिपूर्ण असलेल्या प्रस्तावातील वारसदाराचे नाव दुहेरी प्रतिक्षा सूचीत समाविष्ट करावे. ज्या दिनांकास परिपूर्ण अर्ज प्राप्त होईल त्या दिनांकास संबंधित वारसदाराची प्रतिक्षा सूचीतील ज्येष्ठता निश्चित होईल. त्रुटी पूर्ण अथवा अपूर्ण अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज छाननीअंती फेटाळल्याचे संबंधित मुख्याध्यापकास पोच देय डाकेने कळविण्यात यावे. अर्ज परिपूर्ण असल्यास त्याची पोच संबंधित | मुख्याध्यापकास न चुकता द्यावी. दुहेरी प्रतिक्षा सूची याचा अर्थ संबंधित प्राधिकान्यास दोन स्वतंत्र अशा प्रतिक्षा सूची ठेवणे आवश्यक आहे. या दोन प्रतिक्षासूची गट-क मधील पदांसाठी व गट-ड मधील पदांसाठी वेगवेगळया ठेवणे आवश्यक आहे. एकाच संस्था व्यवस्थापनाखाली चालविल्या जात असलेल्या त्याच जिल्हयातील सर्व शाळांसाठी मिळून एकत्रित असलेली पहिली प्रतिक्षा सूची ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण निरीक्षकाच्या अधिपत्याखालील कार्यक्षेत्रासाठी देखील अशी पहिली प्रतिक्षा सूची एकत्रित राहील. दुसरी प्रतिक्षा सूची याचा अर्थ त्याच जिल्हयातील सर्व खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांचा समावेश असलेली जिल्हा स्तरीय प्रतिक्षा सूची होय. शिक्षण निरीक्षकाच्या अधिपत्याखालील कार्यक्षेत्रासाठी देखील अशी दुसरी प्रतिक्षा सूची एकत्रित राहील. प्रतिक्षा सूची या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-ड नुसार असलेल्या नमुन्यात ठेवणे आवश्यक आहे.
सक्षम प्राधिकारी यांनी पहिल्या प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार व पात्र अर्जदाराने त्यांने धारण केलेल्या अर्हतेनुसार ज्या पदावर दावा केला आहे, ते पद दिवंगत कर्मचारी ज्या शाळेत कार्यरत होता त्याच शाळेत उपलब्ध असल्यास त्या शाळेत त्याची नियुक्तीसाठी शिफारस करावी. संबंधित शाळेत पद उपलब्ध नसल्यास त्या जिल्हयातील संबंधित संस्था व्यवस्थापनाच्या इतर शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करावी. त्याच जिल्हयातील संबंधित संस्था व्यवस्थापनाच्या इतर शाळांमध्ये देखील पद उपलब्ध होत नसल्यास त्याच जिल्हयातील इतर संस्थांच्या शाळेत नियुक्तीसाठी दुसन्या जिल्हास्तरीय प्रतिक्षा यादीतील उमेदवाराची ज्येष्ठतेनुसार शिफारस करावी. दुसन्या सूचीतील पात्र उमेदवारास त्या जिल्हयातील एकापेक्षा अधिक शाळामध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पद उपलब्ध होत असल्यास त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून शाळेचे अंतर कमीत कमी असेल हा निकष विचारात घेऊन सर्वात जवळच्या शाळेत अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी शिफारस करावी.
एखाद्या शाळेत अथवा शाळा समूहात (त्याच जिल्हयातील एकाच संस्था व्यवस्थापनाखालील सर्व शाळा) विशिष्ट अशा विषयाचे शिक्षक संवर्गाचे पद उपलब्ध झाले आहे अथवा शिक्षकेत्तर संवर्गातील विशिष्ट असे पद उपलब्ध झाले आहे, तथापि, पहिल्या प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठ उमेदवारांकडे त्या पदासाठी आवश्यक असणारी अर्हता नसल्यास अशी अर्हता धारण करणान्या कनिष्ठ उमेदवारास प्रतिक्षा यादीतील ज्येष्ठता डावलून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देणे आवश्यक राहील. पहिल्या प्रतिक्षा यादीत अशी अर्हता धारण करणारा उमेदवार उपलब्ध नसल्यासच सक्षम प्राधिकारी जिल्हा स्तरीय दुसऱ्या प्रतिक्षा यादीतून आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराची ज्येष्ठतेनुसार नियुक्तीसाठी शिफारस करेल.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .