दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत.

दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत.



शिक्षण संचनालयाने दि 25 डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सूचना दिल्या आहेत कि ......

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन क्रमांक १ येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२) देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमाकं २ येथील पत्रान्वये कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडीओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

३) दिनांक २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताकदिनी संदर्भ क्रमांक १ येथील शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावे. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक २ येथील पत्रानुसार दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रमदेखील प्रजासत्ताकदिनी घेण्यात यावा.

४) राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा.

५) देशभक्तीपर गीतांवरील कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिंक आहे.दिनांक २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम


महत्वाच्या सूचना-

१. आपणांस उपरोक्त मुद्दा क्रमांक ५ नुसार पुरविलेल्या नमुना मार्गदर्शक व्हिडीओ (१४.४० मिनिटांचा) नुसार कवायत संचलन आयोजित करावे.

२. प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्ट्या कसरत / व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

३. प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा.

४. सामुहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करावा.

५. कार्यक्रमास आपल्या परिसरातील मा. लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनीधींना आमंत्रित करण्यात यावे.

६. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्याचा सामुहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात यावा.

७. कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवरील दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाचा आहे.

८. कार्यक्रमाचे दिवशी मैदान स्वच्छ पांढऱ्या रंगाने पट्टे आखून हिरवी चटई टाकलेले, देशभक्तीमय वातावरण असलेले असावे; जेणेकरून विद्यार्थ्याचा गणवेश खराब होणार नाही.

९. विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्पोपहार (चहा बिस्कीट, फळे, पाणी) देण्यात यावीत.

१०. विद्याथ्यांची नखे काढलेली, कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पायमोजे, हाताला वेणीला तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल.

११. कार्यक्रमाचे वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोण, व्हिडिओ व फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी. एक दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का ? याची पडताळणी करून घ्यावी.

१२. कवायतीच्या सरावासाठी विद्यार्थ्याच्या प्रमाणात पुरेशा शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

१३. विद्यार्थ्याचा दर शुक्रवार व शनिवारी सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक (PT शिक्षक, क्रीडा शिक्षक, NCC चे विद्यार्थी किंवा इतर शिक्षकाची मदत घेण्यात यावी.

१४. सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याचे मागून कवायत साजरी करतील.

१५. कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी. विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचण्याबाबत जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांची राहील.

१६. गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे. कोणत्या गावातील / शहरातील शाळेतील किती विद्यार्थी, कोणत्या शाळेतील मैदानावर येणार आहेत ? मैदान क्षमता, विद्यार्थ्यासाठी व्यवस्था, पार्किंग सुविधा आदि बाबीची पडताळणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची खात्री करण्यात यावी.

१७. आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीतून सूट देण्यात यावी, त्यांना कुठलीही सक्ती करू नये.

१८. पावसाळयाचे वातावरण वाटल्यास कवायत संचालनासाठी आंतर सभागृह (Indoor Hall ) पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवावे, तसेच कवायत संचालनावेळी ऐनवेळी बीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी जनरेटर वा इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी.

१९. प्रस्तुत कार्यक्रम “राष्ट्र प्रथम" संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील १ लाखाचे वर शाळांमध्ये ७ लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत व सुमारे २ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्याव्दारा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम (World Record ) स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी.

उपरोक्त सूचनांप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळांकडून प्रत्येक वर्षाचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त संदर्भीय पत्रांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.

त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

अधिक माहिती साठी परिपत्रक पह शकता.

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ - २६ जानेवारी, २०२६
शासन निर्णय दि २१ जानेवारी २०२६ नुसार शासनाने निर्देश दिले आहेत कि....

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०-०० वा. च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सकाळी ९-१५ वाजता शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल.

३.विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे मा. पालकमंत्री/ मा. मंत्री / मा. राज्यमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतील :-

४. राष्ट्रध्वजवंदन करणारे मा. पालकमंत्री / मा. मंत्री / मा. राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजवंदन करावे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी राष्ट्रध्वजवंदन करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजवंदन समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

५.राष्ट्रध्वजाला वंदन करताना “राष्ट्रगीत” म्हणण्यात यावे / वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन “राज्यगीत” वाजविण्यात यावे. ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१) (२) ३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलनी- १०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजवंदनाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

७.प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता

6. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच आणिबाणीच्या कालावधीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्ती यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१०.अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण

करण्याचा प्रयत्न करावा.

११.दिवसभरात विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/ आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा. प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करावे. प्रभात फेन्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी. तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमांद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा / संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

१२.ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसंदर्भात आचारसंहिता लागू असल्यास त्या जिल्ह्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात :-

१) ध्वजवंदनाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

२) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करण्यात येऊ नये.

३) मा. पालकमंत्री / मंत्री / राज्यमंत्री यांचा भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तुत्व या पुरतेच मर्यादित असावा. बलिदान दिलेल्या हुतात्मांचा तसेच देशाचा गौरव यासंदर्भातील भाषणे असावीत. कोणत्याही राजकीय स्वरुपाची भाषणे नसावीत.



शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.


राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका / खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत.


शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.