राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव* अभियान राबविण्याबाबत. Maz-Gaon-Aarogya-Sampanna-Gaon

राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्याबाबत.


        महाराष्ट्र शासनाने दि १८ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित केला .राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी विविध तरतुदी केल्या .आपण सविस्तर त्या तरतुदी व शासन निर्णय पाहू .

शासन निर्णय :-

१. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणे, माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करून माता व बालकांचे आरोग्यमान सुधारणे, माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवणे, आजारांचे वेळेत निदान व योग्य उपचार उपलब्ध करून देणे, गावांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करून नागरिकांची आरोग्याप्रती जागरूकता वाढवणे, आरोग्य संस्थांच्या सुविधांमध्ये सुधारणा करून, गाव पातळीवर उत्तम उपचार व पुनर्वसन सेवा उपलब्ध करणे, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी आणि १००% अंमलबजावणी सुनिश्चित करणे, गावांना आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांवर गुणदान करून त्यांना आरोग्य संपन्नतेसाठी प्रेरित करणे तसेच प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेळेत आणि गुणवत्तेसह पोहोचवणे यासाठी राज्यामध्ये १ एप्रिल २०२६ पासून " माझं गाव, आरोग्य संपन्न गाव " हे अभियान राबविण्यात येईल.

ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकास प्रतिबंधात्मक, सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि समग्र आरोग्यसेवा उपलब्ध करून देत एक निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त ग्रामीण समुदाय घडविणे हा या आरोग्य अभियानाचा मूलभूत दृष्टिकोन असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा शाश्वत व सहभागी विकास साधणे हीच या अभियाना मागील प्रेरणा आहे.

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव " अभियान राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ग्रामीण भागात राबविण्यात येईल. अभियानाचे एकक ग्रामीण भागात ग्रामपंचायत असेल. सदरहू अभियानात सहभागी होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येईल. अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असतील. सदर अभियान प्रत्येक वर्षी दि. १ एप्रिल ते पुढील वर्षी दि.३१ मार्च पर्यंत राबविण्यात येईल.

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान म्हणजे केवळ एक तपासणी मोहीम नसून, ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावाच्या सर्वांगीण सुधारणेचे व्यापक व्यासपीठ आहे. यामध्ये मुलभूत आरोग्य सेवा, पोषण, स्वच्छता, शुध्द पिण्याचे पाणी, जनजागृती, संगणकीकृत आरोग्य माहिती संकलन, प्रशिक्षण आणि शासन यंत्रणांमध्ये समन्वयांचा समावेश असून, आरोग्य हे ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी असल्याचे प्रतिपादन यातून करण्यात येत आहे.

सदरचे अभियान हे केवळ आरोग्यसेवा सुधारण्यासाठी नसून, सामाजिक बांधिलकी, सहभागी शासन, लोककेंद्रित नियोजन व शाश्वत आरोग्य व्यवस्थापनाच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. या माध्यमातून आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान, SDG-३ (Good Health & Well-being) इत्यादी महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी ही प्रभावी व गतीमान होईल.

या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे व या ठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक/सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे; या अभियानातून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना "आरोग्य संपन्न ग्राम" म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा शासनाचा मानस आहे.


माझं गाव, आरोग्य संपन्न गावची ध्येये खालील प्रमाणे आहेत:-

(i) आरोग्यदायी, जागरुक व सशक्त समुदाय निर्माण करणे.

(i) आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणे.

(i) आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चा व कृतीच्या केंद्रस्थानी आणणे.

(iv) अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटक आरोग्याचे निर्धारक असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य केवळ वैयक्तिक बाब नव्हे तर सामुदायिक बाब म्हणून कृतींना चालना देणे.

(v) सामुदायिक स्तरावर आरोग्याशी संबंधित मुद्यांवर जागरुकता वाढविणे.

आरोग्य ही समुदायाची आणि शासनाची एकत्रित जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करणे.

(vi) सामुहिक वर्तणुकीत बदल:- प्रजनन आरोग्य, पोषण, मानसिक आरोग्य, जीवनशैली पध्दती आणि रोग प्रतिबंध यांच्याशी सबंधित आरोग्यदायी पध्दतीचा अवलंब करण्यास समुदायाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये विविध स्तरावर ग्रामपंचायत, प्रभाग सदस्य, ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती, महिला बचत गट, आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, वैद्य, समुदायातील विविध घटक, शासकीय यंत्रणा इ. मध्ये संवाद वृध्दींगत करून सहयोगी व सहाय्यक वातावरण निर्माण करणे, बैठका, चर्चा, उत्सव इत्यादी द्वारे समुदाय चलित/समुदाय नेतृत्त्वाखालील औपचारिक आणि अनौपचारिक प्रक्रिया सक्षम करणे.

(vii) दुर्बल घटकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करणे.

(ix) समुदायाकडून वाढीव आरोग्य सेवांच्या मागणीला शासनाकडून उचित प्रतिसाद देणे.

(x) आरोग्याच्या प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करणे.

(xi) चांगल्या आरोग्यासाठी समुदायामध्ये योग आणि आयुष यांचे महत्व अधोरेखित करणे.

(xi) आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून रोगांचे, विशेषतः असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक शाश्वत उपाययोजना निश्चित करणे.

(xii) आंतरविभागीय समन्वय: आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता, महिला व बाल विकास, पर्यावरण इत्यादी विभागांमध्ये आंतरविभागीय समन्वय वाढविणे.


३. योजनेत समाविष्ट करावयाच्या प्रमुख आरोग्य बाबी / आजार (Key Health Focus Areas) आरोग्य संपन्न गावाच्या मूल्यमापनासाठी खालील आरोग्य समस्यांच्या निर्मूलन व नियंत्रणावर भर दिला जाईल.

समाविष्ट आजार / योजना:-

A. संसर्गजन्य रोग-

· कुष्ठरोग, क्षयरोग (Tuberculosis TB)

जलजन्य आजार-विषमज्वर (Typhoid), गॅस्ट्रो (Gastroenteritis), अतिसार इत्यादी. किटकजन्य आजार-डेंग्यू, मलेरिया इ.

B. असंसर्गजन्य रोग (NCDs)-

मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Cancer).

C. माता व बाल आरोग्य-

प्रसूतीपूर्व पश्चात काळजी, लसीकरण, कुटूंब कल्याण, कुपोषण निर्मूलन, अति जोखमीच्या मातांची काळजी.

D. इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना-

• शुद्ध पाणी, प्रदूषण नियंत्रण, जैविक कचऱ्याची विल्हेवाट



राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत.

अभियानाची सरिष्टेः (Objectives of the Schemel:-

अ) संसर्गजन्य रोग प्रतिबंधन (Prevention of Communicable Diseases):

() क्षयरोग (Tuberculosis TB) कार्यक्षेत्रातील सर्व संशयित क्षयरुग्णांचा सक्रिय शोध घेऊन १००% क्षयरुग्णांचे निदान व उपचार सुनिश्चित करणे.

(i) कुष्ठरोग (Leprosy): गाव पातळीवर कुष्ठरोग निर्मुलनासाठी १०० टक्के संशयीत कुष्ठरुग्णांचा शोध घेवून त्यांचे निदान निश्चिती करुन उपचार व्यवस्था सुलभ करणे.

(ii) हिवताप, डेंगू व इतर किटकजन्य आजार नियंत्रण : डेंगू-मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करून व जनजागृतीच्या माध्यमातून समुदाय सहभाग वाढवून १००% प्रादुर्भाव नियंत्रण करणे. (iv) जलजन्य आजार (Waterbome Diseases): प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा, शौचालयाचा वापर सुनिश्चित करणे आणि स्वच्छतेसाठी ग्रामस्तरावर जन प्रबोधन करणे. अतिसार प्रतिबंधासाठी नियमीत स्वच्छ हात धुणे तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे.

(ब) असंसर्गजन्य रोग व्यवस्थापन (Management of Non-Communicable Diseases - NCDs):-

(i) स्क्रीनिंग व निदानः ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक मधुमेह, उच्च रक्तदाब, मुख, स्तन व गर्भाशय कर्करोगासाठी स्क्रीनिंग करणे.

(i) फॉलोअप व औषधोपचारा निदान झालेल्या सर्व रुग्णांना नियमित फॉलोअप सेवा आणि औषधोपचार सुविधा १००% उपलब्ध करून देणे.

(ii) समुपदेशन व जीवनशैली सुधारणा आरोग्यदूत, आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून संतुलित आहार, व्यायाम, व्यसनमुक्ती यासाठी समुपदेशन.

(iv) पोषण आणि व्यायाम : यामध्ये समुदायाकडून आहार व व्यायामासबंधी सकारात्मक कृती करणे अपेक्षित आहे. उदा. पौष्टिक समतोल आहाराचे सेवन, जंक फूड टाळणे आणि सर्व वयोगटातील लोकांनी नियमित व्यायाम करणे इत्यादी.

(v) स्वच्छता आणि पर्यावरण यामध्ये समुदायाकडून स्वच्छता व पर्यावरणासबंधी सकारात्मक कृती करणे अपेक्षित आहे. उदा. वैयक्तिक स्वच्छता, उघडयावर शौचास न जाणे, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे संवर्धन, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर, ऊर्जा कार्यक्षमता, प्रदूषण नियंत्रण इत्यादी.

(vi) Cancer व इतर गंभीर आजारी पात्र लाभार्थीना Palliative Care (उपशामक काळजी) सेवा जनसहभागातून पुरविणे.

(vi) दुर्बल घटकांच्या आरोग्याप्रती संवेदनशीलता यामध्ये समुदायाकडून दुर्बल घटकांसाठी सकारात्मक कृती करणे अपेक्षित आहे. उदा. वृध्द लोकांची आवश्यक काळजी घेणे, लहान मुलांची, किशोरवयीन मुलांची-मुलींची सुरक्षितता, तरुणांमधील ताणतणाव, व्यसनाधीनता कमी करणे, मानसिक आरोग्यासाठी उपाययोजना इत्यादि.

(vii) मानसिक आरोग्याबाबत जनतेचा दृष्टीकोन बदलुन उपलब्ध सेवांचा अंगिकार वाढविणे.


(क) माता-बाल आरोग्य (Maternal & Child Health MCH):-

१) प्रसूतिपूर्व काळजी (ANKI

() निरंक माता मृत्यू / बाल मृत्यू झालेला असणे-

माता मृत्यू म्हणजे कोणत्याही महिलेचा गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतर ४२ दिवसांच्या आत, गरोदरपणाशी निगडित कोणत्याही कारणाने किंवा गरोदरपणात वाढलेल्या गुंतागुंतीमुळे किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे होणारे मृत्यू. (यामध्ये अपघाताने किंवा प्रासंगिक कारणाने होणाऱ्या मृत्यूचा समावेश नाही). बाल मृत्यू म्हणजे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा कोणत्याही कारणाने झालेला मृत्यू.

i) १००% गर्भवती महिलांचे लवकर नोंदणीसह किमान ४ प्रसूतिपूर्व तपासण्या पूर्ण करणे. (ii) लोहगोळ्या, कॅल्शियम व धनुर्वात लसीकरण इत्यादींचा नियमित पुरवठा व सेवा देणे.

(iv) वात्सल्य कार्यक्रमाअंतर्गत गर्भधारणापूर्व सेवांची गुणवत्ता वाढवून गर्भधारणेवेळी माता सशक्त असल्याचे सुनिश्चित करणे.

२) संस्थात्मक प्रसुती (Institutional Delivery);

(i) १००% गरोदर महिलांची प्रसूती आरोग्य संस्थेमध्ये व प्राधान्याने शासकीय संस्थेत सुनिश्चित करणे.

(i) गरोदरपणात सर्व आवश्यक सेवा पुरवून तसेच आहार व विश्रांतीबाबत काळजी घेऊन सुध्द बालक जन्माला येण्यासाठी पाठपुरावा करणे.

३) लसीकरण (mmuntzation):

(i) ०ते ५ वर्षातील सर्व बालकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण लसीकरण पूर्ण करणे.

४) कुटुंब नियोजन साधनांचा वापरः

() पुरुष कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेला पाठींबा देऊन सर्वच कुटुंब कल्याण साधनांचा वापर वाढविणे.

५) जी पुरुष समानताः यामध्ये समुदायाकडून श्री पुरुष समानतेशी निगडित विविध बाबींवर सकारात्मक कृती करणे अपेक्षित आहे. उदा. अर्भकाची लिंग तपासणी व मुलगाच हवा हा हट्ट टाळणे, आई आणि बाळाच्या संगोपनात पुरुषांचा सहभाग, मुली आणि मुले यांचे बारावी नंतरही शिक्षण सुरु ठेवणे, लवकर आणि जबरदस्तीने लग्न न करणे, लिंग आधारित भूमिका, लिंग आधारित हिंसाचार टाळणे इत्यादी.

वरील उद्दिष्टे समोर ठेवुन संबंधित निर्देशांकाच्या आधारे गावाचे आरोग्य गुणांकन केले जाईल आणि गुणवत्तेच्या आधारे गावांना " माझं गाव, आरोग्य संपन्न गाव " अभियानात मानांकन व पुरस्कार दिले जातील.


५. अभियानाचे स्वरूप (Nature of the Schema):

ग्रामपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यासाठी जीवनशैलीत तसेच आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे या अभियानाचे चार प्रमुख स्तंभ असतील.

सदरचे अभियान हे समुदाय सहभाग, आरोग्य सेवा, प्रशासकीय समन्वय, नवोपक्रम व परिणामकारक मूल्यमापन या पंचसुत्रीवर आधारित आहे. या अभियानाची रचना, अंमलबजावणी प्रक्रिया आणि निगराणी ही एकात्मिक, बहुविभागीय व सहभागी दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.


६.अभियानाची वैशिष्टे:

() जनसहभागावर आधारितः अभियानात ग्रामपंचायती, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळ, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व स्वयंसेवक तसेच रुग्ण सहाय्यक गट (Patient Support Groups) यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. ग्रामसभा, VHSNC, आरोग्य संवाद यांचे आयोजन करून जनसहभाग सुनिश्चित केला जाईल.

(i) आरोग्य सेवा गतिमान करणारे अभियान प्राथमिक आरोग्य सेवा, लसीकरण, ANC / PNC, NCD तपासणी, पोषण, स्वच्छता, जलव्यवस्थापन यांचे एकात्मिक व वेळापत्रकबद्ध नियोजनास चालना देण्यात येईल. घरपोच सेवा, मोबाईल हेल्थ युनिट्स व ई-संजीवनी यांचा प्रभावी वापर केला जाईल.

(ii) प्रशासकीय समन्वयात्मक अभियान अभियानामध्ये सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण व ग्रामविकास या विभागांचा समन्वय साधून कार्यप्रवाह निश्चित करण्यात येईल. तालुका व जिल्हास्तर समित्यांद्वारे या समन्वयाचे नियोजन व संनियंत्रण केले जाईल.

(iv) मूल्यमापनाधिष्ठित अभियान: अभियानाची प्रत्येक टप्यावर बाह्यमूल्यमापन व लोकाधारित देखरेख (CRM) द्वारे ज्यात ग्रामसभा, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती (VHSNC) प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र स्तरावरील जन आरोग्य समिती यांच्या पुढाकारातून प्रभावी तपासणी केली जाईल. निकषांवर आधारित स्कोअर कार्ड प्रणालीद्वारे प्रगतीचे मूल्यमापन व रॅकिंग निश्चित करण्यात येईल.

(v) प्रोत्साहनात्मक अभियान: चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांना पुरस्कार, प्रमाणपत्र व राज्यस्तरीय मंचावर गौरव केला जाईल. तसेच संबंधित वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व इतर सबंधित आरोग्य कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात येईल.

(vi) IT प्रणालीचा वापर आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी HMIS (Health Management Information System) तसेच इतर | प्रणालीचा वापर बंधनकारक असेल. यामुळे तपासणी व उपचार नोंदी आणि रुग्णांचा पाठपुरवठा (Tracking) अधिक अचूक व वेगवान होईल.

महत्व ;एकंदर काय तर या शासन निर्णयाने राज्यातील लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदतच होईल.

शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.

राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.