PM SHRI योजनेतंर्गत दि. १३ नोव्हेंबर, २०२४ ते १२ डिसेंबर, २०२४ या कालावधीत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर पुढील २५ दिवसांत PM SHRI शाळांमध्ये वेळापत्रकानुसार उपक्रम राबविणेबाबत.

PM SHRI योजनेतंर्गत दि. १३ नोव्हेंबर, २०२४ ते १२ डिसेंबर, २०२४ या कालावधीत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर पुढील २५ दिवसांत PM SHRI शाळांमध्ये वेळापत्रकानुसार उपक्रम राबविणेबाबत.


MPSP ने दि 6 नोव्हेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित करून सूचित केले आहे कि......

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने PM SHRI योजनेतंर्गत देशभरात १४,५०० हून अधिक PM SHRI शाळा स्थापन करावयाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने PM SHRI योजनेअंतर्गत देशभरात ३२ राज्ये / केंद्रशासित प्रदेश / KVS / NVS इत्यादि मिळून १२,०८४ PM SHRI शाळांची निवड करण्यात आली आहे.

२ केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या ३११ अशा एकूण ८२७ शाळांना उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मधील शिफारशीच्या अनुषंगाने PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे हे आपणांस ज्ञात आहे. म्हणजेच PM SHRI शाळांव्दारे इतर नजिकच्या शाळांना समतापूर्ण व आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करावयाचे आहे

३ उपरोक्त केंद्र शासनाच्या दि.२७/०९/२०२४ च्या पत्रान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने PM SHRI शाळांमध्ये १. Vidya Vaibhav (Olympiad) २ Manthan Mandal (Debate Club) 3. Digital Quest आणि Discover and Learn Local Sites इत्यादि उपक्रम पुढील २५ दिवसांत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर उपक्रमांमुळे PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना, चिकीत्सक विचारास प्रोत्साहन, आणि सर्जनशीलतेस प्रोत्साहन मिळेल परिणामी PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास विकसित होईल. सदर पुढाकारांमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभांची जोपासना होण्यास मदत होईल आणि त्यांना शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल. परिणामी त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या वाढीस चालना मिळेल. अंमलबजावणी करण्याच्या उपक्रमांचा कृती आराखडा परिशिष्ट - अ' मध्ये जोडण्यात आलेला आहे.



४ त्यानुषंगाने जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये वेळापत्रकानुसार सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी. अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नियमित उपक्रमांची अद्ययावत माहिती PM SHRI शाळांच्या सोशल मीडिया हँडलवर (फेसबुक, एक्स इ.) पोस्ट टाकण्यात यावीत.परिणामी PM SHRI योजनेविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल.

5 तसेच जिल्हा व महानगरपालिकांनी PM SHRI शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या नियमित उपक्रमांची अद्ययावत माहिती गुगल ट्रॅकर भरण्यात यावी.

6 सदर उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांना व अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करावे. तसेच तालुका नोडल अधिकारी यांनी PM SHRI शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दररोज जिल्हा नोडल अधिकारी यांना सादर करणे. आणि जिल्हा नोडल अधिकारी यांनी या कार्यालयास अंमलबजावणी करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नियमित या कार्यालयास सादर करावी.


शासन निर्णय 27 सप्टेंबर २०२२ नुसार

PM SHRI (PM Schools for Rising India) योजनेसाठी एकल समन्वय यंत्रणा Single Nodal Agency (SNA) म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई. व समन्वयक अधिकारी (Nodal Officer) म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,मुंबई यांनी शासनाच्या वतीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

२. एकल समन्वय यंत्रणा (SNA) व नोडल अधिकारी यांनी PM SHRI (PM Schools for Rising India संदर्भात केंद्र शासनाने निश्चित केली जाणारी मार्गदर्शक तत्वे व सूचना यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सदर योजनेच्या प्रगतीबाबत शासनास वेळोवेळी अवगत करावे.


राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका / खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत.


राज्यातील शाळांमध्ये चित्रपट / लघुपट / नाटक / अनुषंगिक ई-शैक्षणिक साहित्य दाखविण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याबाबत


शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे.


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत.


 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.


 राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत


 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.