जिल्हांतर्गत बदली -बदली पूर्व प्रक्रिया ,district transfer Pre process

जिल्हांतर्गत बदली-बदली पूर्व प्रक्रिया 



शासन निर्णय दि १८ जून २०२४ नुसार......

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे.

२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे

परिशिष्ट - १ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या

अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील.


२.२ प्रशिक्षण :-

जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.


२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :-

२.३.१ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील.

सदर कार्यवाही करीत असताना प्रथमत: मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. ३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्हयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे, त्या जागा दाखविण्यात येतील.

२.३.२ समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.

२.३.३ अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.

२.३.४ शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.


२.४ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे :

२.४.१ शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या

प्रसिध्द करतील. तसेच टप्पा क्र.७ साठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिध्द करतील (अवघड

क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करतील).

२.४.२ तसेच विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करतील.

२.४.३ उपरोक्त नमूद याद्यांबाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिध्द झाल्यापासून तीन दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून तीन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल. सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल.

२.४.४ बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रीया सुरु होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. बदली प्रक्रीया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईल मध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही.


शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे :

३.१ बदलीस पात्र शिक्षक यांचेकडून जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी मागविण्यात यावा. (सोबतच्या विवरणपत्र १ नुसार).

३.२ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी देणे आवश्यक राहील. (सोबतच्या विवरणपत्र २ नुसार)

३.२.१ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यासाठीच्या यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा (विवरणपत्र ३).

३.२.२ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास, किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास, त्यांनी सोबतच्या विवरणपत्र ४ मध्ये नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी.अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.

३.३ बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.