जिल्हांतर्गत बदली-बदली प्रक्रिया कार्यपध्दती
शासन निर्णय दि १८ जून २०२४ नुसार......
४.१ टप्पा क्र. १ :-
ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा
शाळांमध्ये जर बदलीस पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल.
उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र. २.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.
४.१.१ ज्या शाळेत तीन बदलीस पात्र शिक्षक आहेत, अशा वेळी तेथील दोन बदलीस पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र. २.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.
४.१.२. शाळेत एकच बदलीस पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.
४. २ टप्पा क्र. २ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ यांच्या बदल्या :-
४.२.१. टप्पा क्र. १ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी
जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी
(Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या
वदल्या करण्यात याव्यात.
४.२.२. विशेष संवर्ग भाग - १ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच वदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
४.२.३. विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमत: बदली अनुज्ञेय राहील. ४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे वदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये
बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची वदली विशेष संवर्ग भाग १ मधुन होणार नाही. तथापि, त्यांने विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील.
४.२.७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.२.८. विशेष संवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. अप्रवि- २०१८/प्र.क्र.४६/आरोग्य - ६, दि.१४.९.२०१८ मधील तरतूदी नुसार दिव्यांगत्वाबाबतचे
ऑनलाईन युडी-आयडी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्रावावत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल.
४.३. टप्पा क्र. ३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ यांच्या बदल्या :-
४.३.१.टप्पा क्र.२ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात
यावी व विशेष संवर्ग भाग- २ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार
दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ यांच्या बदल्या
करण्यात याव्यात.
४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.
४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या
शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची वदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही वदलीस पात्र धरण्यात येईल.
४.३.५. विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचेद्वारा तालुकास्तरावर करण्यात यावी. ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग / कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.
४.३.६. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.३.७. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे
आवश्यक आहे.
४. ४. टप्पा क्र. ४ - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या :-
४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
४.४.२. यासाठी ज्या वदली अधिकार प्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र - २ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
४.४.३.अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत वदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा जेष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे, त्यांना प्राधान्य देण्यात यावे.
४. ४. ४. अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या
कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
४.४.५. वदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्र. ४ मधील सुधारीत रिक्त जागा व वदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील. ४.४.६. वदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर वदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध
होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
४.४.७ बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल.
४.५ टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :-
४.५.१. टप्पा क्र. १, २, ३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व
वदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात
घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. ४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.
४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.
४.५.४. वदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे वदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.
४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र.४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
४.५.६ विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल.
४.६ टप्पा क्र. ६ :- विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा :-
टप्पा क्र.५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार वदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे वदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
४.७. टप्पा क्र. ७:- अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा टप्पा:-
टप्पा क्र.६ पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्र. ७ रावविण्यात येईल. या टप्प्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. ( मुद्दा क्र. २.४.१) विशेष संवर्ग भाग-१ मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्र. ७ साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शविला आहे (मुद्दा क्र.४.२.२ अन्वये) अशा शिक्षकांची बदली या टप्यात होणार नाही.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .