निपुण भारत - भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत.
शासन निर्णय दि २७ ऑक्टोंबर २०२१ नुसार ......
प्रस्तावना:-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.
त्यासाठी भारत सरकारने "समग्र शिक्षा" मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रामध्ये मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची आवश्यकता:-
दिनांक २२ जून, २०१५ च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील शाळांमध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रत्येक मुलाने मुलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे. कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे ध्येय होते. याकरीता अधिकाऱ्यांनी, शाळा व्यवस्थापनाने व अधिक महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी या कार्यक्रमाला गती दिली. सन २०१४, २०१६ व २०१८ च्या ASER अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळाले. तथापि, कोविड १९ च्या वैश्विक महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला.युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा ६५% ते ७४% वेळ वाया गेला आहे.
अझिम प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर २०२० मध्ये त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ ४२% मुले, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली. ज्या मुलांना ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहणे शक्य झाले. त्यांच्या बाबतीतही सदर संधी अपेक्षित परिणामकारक ठरली नाही. बहुसंख्य शिक्षक ऑनलाईन वर्गामध्ये दररोज प्रत्येक इयत्तेला एकच तास शिकवू शकले. ८०% पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्यांबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले व ९०% पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले.
अशियन विकास बँक २०२१ नुसार, शाळा बंद राहिल्यामुळे ५ अशियन देशांमधील (भारतासह ) मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या ३.५% ते ४.७% नुकसान झाले. तसेच दक्षिण आशियाच्या सन २०२० सालच्या एकूण ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% ते ७% नुकसान झाले. एका सर्वेक्षणानुसार, शाळा आधीच सोडलेल्या ३% मुलांबरोबरच ६% मुले शाळेत परत येण्याची शक्यता नाही. (ए. एस. ई. आर. २०१९) महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेमधून आणखी २४ दशलक्ष मुलांची गळती होईल. म्हणून सध्याची स्थिती व गेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पाया "पायाभूत शिक्षण" असणे आवश्यक आहे.
शासन निर्णय:-
राज्यात सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता ३ री पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी "निपुण भारत" अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देत असून पुढीलप्रमाणे दिशानिर्देश करीत आहे :-
१.भाषिक कौशल्ये:-
३ ते ९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे व त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल. ज्या विद्यार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी वा अन्य भाषा अधिक सहजतेने शिकू शकतात.
१.१. मौखिक भाषा विकास:- लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.
१.२. उच्चार शास्त्राची जाणीव:- शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे
गरजेचे आहे.
१.३. सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे:- यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.
१.४. शब्द संग्रह:- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा.
१.५. वाचन व आकलन:- मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.
१.६. वाचनातील ओघवतेपणा:- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व
आकलन.
१.७. लेखन:- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.
१.८. आकलन:- छापील मजकूर / पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत. १.९. वाचन संस्कृती / वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.
२. पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये:-
पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमश: मांडणी करणे, आकृतीबंध / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.
प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन :-
संख्या पूर्व:- गणन व संख्या ज्ञान
संख्या व संख्येवरील क्रिया:- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.
गणना करणे :- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.
आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करुन त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे..
नमुना / संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.
६. गृह अध्यापन आणि स्वयंशिक्षण:-
कोविड१९ या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांना महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागत आहे. केवळ तंत्रज्ञानाद्वारे १००% विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे, हे
दिसून आले आहे. त्यासाठी ऑफलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी नवीन पध्दतीचा वापर केला पाहिजे.विद्यार्थ्यांनी घरी शिकणे यामध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी शाळेने तसेच पालकांनी भरपूर छापील साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. जलद वाचन, संख्या साक्षरता व पाढे यासाठी वाचन साहित्य व कार्यपुस्तिका इत्यादी सामग्री शाळेत आणि घरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी समग्र शिक्षा, STARS प्रकल्प व स्थानिक स्वराज्य संस्था पुरेशी तरतूद उपलब्ध करतील. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही गट व ग्रामपंचायत यांना छापिल साहित्य व सराव तक्ते तयार करुन विद्यार्थ्यांना देण्यासाठी CSR व अशासकीय संस्था (NGO) यांची मदत घेण्यात येईल. संगणक व भ्रमणध्वनी (मोबाईल ) यांचा शिक्षणात वापर करावा लागेल. मात्र दुर्गम भागातील विद्यार्थी व संगणक साक्षर विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करावी लागेल.
शाळेच्या ग्रंथालयातून छोटी गोष्टींची पुस्तके, अध्यापन अध्ययन साहित्य या आधारे पालक मुलांबरोबर घरी नियमीतपणे कोणत्या कृती करू शकतात त्याची यादी तयार करून पालकांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते. यासाठी खालील उपक्रमे आयोजित करता येतील.काही सोप्या कृती, चिठ्ठया (लेबल) वाचणे, वर्तमानपत्रातील, नोटांवरील, कॅलेंडरवरील शब्द वाचणे तसेच पुस्तके वाचणे, खेळ खेळणे, गाणी व कविता म्हणणे, आवाजातील योग्य चढ उतारासह गोष्टी सांगणे व मुलांबरोबर संवाद साधणे.
छापील साहित्याबरोबरच जे पालक शिकण्याचे अन्य साहित्य प्राप्त करू शकतात व ज्यांचेकडे अंतरजाल (इंटरनेट) उपलब्ध आहे असे पालक भ्रमणध्वनीवर शैक्षणिक अॅप डाऊनलोड करून मुलांना मार्गदर्शन करु शकतात. असा संगणकीय मजकूर पाठ्यपुस्तकांमधून क्यूआर कोडद्वारा स्कॅनिंग करीता उपलब्ध आहे. वॉट्सअॅप आधारित स्वाध्याय, ऑनलाईन वर्ग व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (NCERT) व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्याद्वारा उपलब्ध करून दिलेली यूट्युबवरील हक-श्राव्य साधने शैक्षणिक मूल्यमापनाचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पालकांना उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे पालकांनी मुलांना प्रसारमाध्यमे (Mass Media), दूरदर्शन, रेडिओ यावरील कार्यक्रम व दूरध्वनीद्वारे परस्पर संपर्क, ध्वनीवर्धकावर मोठ्याने वाचन ( २-३ मुलांच्या गटामध्ये) याचा वापर करायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
गाव/ मोहल्ला / वस्ती या स्तरावर ग्राम शिक्षण मंडळे गठित करून यामध्ये लहान मुलांमध्ये वाचन, आकलन, लेखन व संख्या आकलन सुधारावे, यासाठी गावातील उच्च माध्यमिक स्तरावरील / पदवीधर विद्यार्थी आणि लहान मुलांच्या छोट्या छोट्या गटामध्ये चर्चा घडवून आणता येतील.सहाध्यायी शिक्षण व गट शिक्षण (भावंडे किंवा जवळचे मित्र याबरोबर शिक्षण) याद्वारे स्वयंशिक्षणाला प्रोत्साहन देता येईल.राज्य / जिल्हा स्तरावरून सुरु केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देणे यासाठी पालकांचे सक्षमीकरण करावे.गुगल रीड अलोंग, पिंटरेस्ट शब्द जुळवणे खेळ इत्यादी अॅपचा उपयोग करुन ओघवते वाचन करण्याची क्षमता वृन्धिंगत करता येईल. त्यातून विद्यार्थ्यांची ओघवत्या वाचनामधील प्रगती पाहता येईल.
८. अभियानाविषयी जाणीव जागृती (माहिती, शिक्षण व संपर्क):-
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी खालील बाबी केल्या जाव्यात:-
• मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाबाबत माहिती आणि निकालांचा आलेख सर्व शाळा ठळकपणे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करतील.
.सदर अभियानातून शाळेतील शिक्षणाद्वारे विषयवार व इयत्तावार प्राप्त करावयाची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes ) शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना अवगत केल्या जातील. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून शाळा, शिक्षक व पालक यांचेकरीता भित्तीपत्रके, पत्रे, सामाजिक माध्यमे संदेश, आकाशवाणी व दूरदर्शन वरील भाषणे इत्यादी संपर्क सामग्री तयार करून प्रसारित
करेल.मुलांना घरी शिकण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सोपी सामग्री, गमतीदार अशा कृती व कृतीपुस्तिका उपलब्ध करण्यात येतील.सदर अभियान ही एक लोकचळवळ होण्यासाठी वेळोवेळी ग्राम जागरूकता बैठक / सभा, शालेय मेळा, पुस्तक जत्रा, वाचनाचे कार्यक्रम, गोष्टींचा मेळा, गणित मेळा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ग्रामपंचायत / शाळा व्यवस्थापन समिती यांची भूमिका महत्वाची असेल.
९. आर्थिक तरतूद व त्याचा वापर:-
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानासाठी समग्र शिक्षा व इतर संबंधित प्रकल्प (उदा. STARS) वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकातील तरतुदीचे अधीन राहून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. समग्र शिक्षा च्या नियमावलीनुसार निधी वितरण व लेखा परिक्षण केले जाईल. याव्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचेकडील तरतूद अन्य उपक्रमांसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देऊ शकतील.
निपुण शपथ (प्रतिज्ञा)
आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.
आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया. जिथे बालके अर्थपूर्ण याचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विदयार्थी राहतील...
अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक' घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .