“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” करिता जन आरोग्य समितीची स्थापना करण्याबाबत.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” करिता जन आरोग्य समितीची स्थापना करण्याबाबत.


शासन निर्णय २० मार्च २०२६ नुसार शासनाने निर्देश दिले आहेत कि.....

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदीराच्या धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याकरीता मनुष्यबळ, घटकनिहाय आवर्ती व अनावर्ती खर्चाच्या बाबी व रुग्ण कल्याण समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार अबंधित निधी (Untied Fund) चा आवर्ती खर्चासाठी विनियोग व तत्सम बाबी निश्चित केल्या आहेत. आपला दवाखान्यामार्फत दिल्या जाणान्या आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे, नागरिक / रूग्णांच्या आरोग्यविषयक समस्यांचे गुणात्मक निराकरण करणे, संस्था / विभागांतर्गत समन्वय स्थापित करणे व आरोग्यविषयक उपक्रम / कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे, आरोग्य संस्था बळकटीकरण करणे व त्यासाठी अंबधित निधीचा सुयोग्य व पारदर्शक विनियोग करणे अशा मुलभूत घटकांकरीता आपला दवाखानास्तरावर जन आरोग्य समिती स्थापित करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (AAM-UPHC) व आयुष्मान आरोग्य मंदीर नागरी आरोग्य केंद्रांमध्ये (AAM-UHWC) जन आरोग्य समितीची स्थापना करून कार्यान्वित करणेबाबत मान्यता देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांकरीता जन आरोग्य समित्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


२. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्तरावरील जन आरोग्य समितीची रचना व कार्यपध्दती खालीलप्रमाणे:-


१) जन आरोग्य समितीची उद्दिष्टे-

१. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदीरे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे याकरिताच्या जन आरोग्य समितीसाठी निश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे व गुणात्मक मानके विचारात घेऊन राज्यस्तरिय आपला दवाखाना करिताच्या जन आरोग्य समितीने सदर मार्गदर्शक तत्वे व गुणात्मक मानकांनुसार कामकाज करणे.

२. जन आरोग्य समिती महानगरपालिका क्षेत्राकरीता नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा व नगरपरिषदा / नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रांकरीता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा एक अविभाज्य घटक म्हणून कामकाज करेल. जन आरोग्य समिती नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी / जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या दिशानिर्देशानुसार कामकाज करेल.

३. आरोग्य सेवा सुविधांचे प्रशासकिय व्यवस्थापन व जबाबदान्या, सामाजिक उत्तरदायित्व व समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठी संस्थात्मक व्यासपीठ निर्माण करणे.

४. उपलब्ध अबंधित निधीचा (Untled Funds) आवर्ती खर्चासाठी योग्य वापर व व्यवस्थापन करणे आणि आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधण्यास एक छत्र म्हणून कार्य करणे.

५. समुदाय स्तरावरील विविध वयोगटातील रुग्णांस उपचार व प्रयोग शालेय चाचण्याच्या सोयीसाठी पाठपुरावा करणे व त्यास प्रोत्साहन देणे.

६. समुदाय स्तरावर विविधोपचार, पाठपुरावा, सर्वेक्षण इत्यादीसाठी कार्यक्षेत्रातील संघटित स्वंयसेवक (NSS, NOC, RED CROSS, SOOUTS, YUVA Group) यांचा सहभाग निश्चित करणे.

७. आपला दवाखाना स्तरावर दाखल होणा-या कुटुंबांना दर्जेदार व निकोप आरोग्य सेवा उपलब्धता, जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी व तक्रार निवारणासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करणे.

८. नागरी भागात आरोग्य सेवेचा दर्जा उंचविण्यासाठी शासकिय विविध आरोग्यविषयक योजना, सी. एस. आर. आणि धर्मादाय संस्था यांच्याकडून देणगीव्दारे निधी न स्वीकारता वस्तु स्वरुपात साहित्य प्राप्त करणे.

९. आरोग्यविषयक सुविधेसाठी नियोजन हाती घेण्यास महानगरपालिका, नगरपरिषदा / नगरपंचायती व कटकमंडळे यांचा सक्रिय पाठिंबा मिळविणे.


३) जन आरोग्य समितीसाठी सर्वसाधारण सुचना:-

१. समिती सदस्य पदाचा कार्यकाळ हा किमान दोन वर्षांचा असेल. जेणेकरुन सर्व सदस्यांना या समितीचे प्रतिनिधीत्व करता येईल.

२. महानगरपालिका क्षेत्रातील आपला दवाखान्याच्या वैद्यकिय अधिकारी यांनी समितीचे सदस्य सचिव या नात्याने जन आरोग्य समिती सदस्यांची विहित निकषानुसार निवड करावी व त्यास महानगरपालिकेच्या नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीची मान्यता घ्यावी.

३. नगरपरिषदा / नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रातील आपला दवाखान्याच्या वैद्यकिय अधिकारी यांनी समितीचे सदस्य सचिव या नात्याने जन आरोग्य समिती सदस्यांची विहित निकषानुसार निवड करावी व त्यास जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीची मान्यता घ्यावी.

४. जन आरोग्य समितीमध्ये आपला दवाखाना कार्यक्षेत्रातील सर्व समुदायामधील चांगले व गुणात्मक प्रतिनिधीत्व करणा-या एकुण प्रतिनिधींपैकी १/३ प्रतिनिधी हे अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती या संवर्गातील नियुक्त करावेत. तसेच सदर समितीमध्ये महिलांना किमान ५०% प्रतिनिधीत्व द्यावे.

५. जन आरोग्य समितीची रचना व सदस्यांची माहिती भ्रमणध्वनी क्रमांक / दुरध्वनी क्रमांकासह आपला दवाखानाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करावी.


४) जन आरोग्य समितीची भूमिका व जबाबदारी -

१. सर्वांसाठी दर्जेदार व निकोप आरोग्य सेवांची तरतूद व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आपला दवाखान्यासाठी मदत, सहाय्य आणि समर्थन द्यावे.

२. आपला दवाखान्यासाठी दिल्या जाणाच्या आरोग्य सेवांची यादी नागरिकांच्या सनदेनुसार असल्याची खात्री करावी.

३. आपला दवाखान्यामध्ये दिल्या जाणान्या बाह्यरुग्ण सेवा (मोफत तपासणी व उपचार), मोफत औषधोपचार मोफत प्रयोगशाळा तपासणी, गभर्वती मातांची तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा व मोफत लसीकरण सेवा इत्यादी प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. तसेच गर्भवती महिला, स्तनपान देणारी महिला, लहान बालके, किशोरवयीन मुले यांच्या आरोग्य तपासणीकरीता शिबिरे व योगा सत्र याचे आयोजनाबाबत खात्री करणे.

४. आपला दवाखान्यात स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, कचरामुक्त परिसर स्वच्छ शौचालये, स्वच्छ लिनन, स्वच्छ प्रतिक्षालये, योग्य सुरक्षा व्यवस्था, जैव-वैद्यकिय कचरा व नियमित कचन्याची सुयोग्य विल्हेवाट व देखभाल व्यवस्था सुनिश्चित करुन घेणे व त्याची दिशादर्शक फलके योग्य ठिकाणी लावली असल्याची खात्री करणे.

५. आपला दवाखान्यामध्ये अत्यावश्यक औषधांची यादी व निदानात्मक यादीप्रमाणे रुग्णांच्या उपचाराबाबत खात्री करणे.

६. आपला दवाखान्यात सौहार्दपूर्ण वातावरण राहील व सांस्कृतिक प्रोत्साहन राहील. प्रशिक्षण / दिशानिर्देश / संवेदनशीलतेव्दारे सुधारात्मक यंत्रणेस प्रतिसाद असावा.

७. आपला दवाखाना स्तरावर समाजातील गरीब व असुरक्षित घटकांना निकोप आरोग्य सेवा मिळण्यासाठी कोणत्याही अडचणीस सामोरे जावे लागू नये व त्यांना त्यांच्या भेटीच्यावेळी आरोग्य सेवा नाकारली जाणार नाही, याची खात्री करणे.

८. आपला दवाखाना स्तरावर सोशल मिडिया व डिजिटल जनसंपर्क वापर प्रोत्साहित करणे, गंभीर आजार असलेल्या रुग्णांस निकोप आरोग्य सेवा दिली असल्यास, सदर रुग्णांची गृह / समुदाय पातळीवरील भेटी देऊन पाठपुरावा करणे.

९. आपला दवाखाना स्तरावर निश्चित केलेल्या सुविधा व गुणवत्ताविषयक मानके परिपूर्ण होण्यासाठी नियमित आढावा घेणे व त्यावर देखरेख करणे.


५) जन आरोग्य समितीची कार्ये:-

१. सामाजिक व पर्यावरणीय निर्धारकांवरील बहुक्षेत्रिय राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे नियोजन व त्यास समर्थन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून समिती काम करेल.

२. क्षेत्रिय पातळीवर वार्षिक आरोग्य दिनदर्शिका दिवस साजरे करणे.

३. विविध आजारांच्या सनियंत्रणासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी सामुदायिक पातळीवर करणे.

४. स्थानिक महिला गट / बचत गट / शेतकरी गट / सांस्कृतिक गट / महिला आरोग्य समिती / दूध विक्री संघ व इतर संघटनांचा आरोग्य कार्यक्रमांत सहभाग घेणे. लिंग समानता व महिलांच्या आरोग्यविषयक समस्या निवारणास प्रोत्साहन देणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे व अंमली पदार्थ सेवनावर प्रतिबंध घालणे.

५. रेडिओ, सोशल मिडिया, इत्यादींचा अधिकतम वापर करुन आरोग्य व आर्थिक जोखीम रक्षणासाठी विविध शासकिय योजनेंतर्गत येणाच्या सेवा व हक्क याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे. ६. सामाजिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यास प्रोत्साहन देणे.


६) जन आरोग्य समितीच्या बैठकांचे नियोजन:-

१. जन आरोग्य समितीची दरमहा एक याप्रमाणे वार्षिक १२ बैठका होणे अपेक्षित आहे. तथापि, सदर समितीच्या वार्षिक किमान १० बैठकांचे आयोजन करणे क्रमप्राप्त व अनिवार्य आहे.

२. जन आरोग्य समितीचे सदस्य सचिव हे मासिक बैठकांचे आयोजन करतील आणि बैठकीचा वार, दिनांक व वेळ, विषयसुची इत्यादीचा तपशिल समितीच्या सदस्यांना लेखी स्वरुपात कळवतील.

३. बैठकीकरीता आवश्यक गणपुर्तीसाठी समितीच्या एकुण सदस्यांपैकी ५० टक्के समिती सदस्यांची उपस्थिती अनिवार्य राहील. समितीची बैठक सुरु करण्यासाठी पुरेशी गणपुर्ती नसेल तर ती बैठक स्थगित केली जाईल व गणपुर्तीसाठी उपस्थित असलेल्या सदस्यांच्या सोयीच्या वेळेनुसार सुचनापत्रक काढून सदर बैठक त्याच दिवशी आयोजित करावी. पुन्हा आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ५० टक्के गणपूर्ती झाली नसल्यास, विषयसुचीनुसार बैठक त्याच दिवशी आयोजित करावी. गणपुर्तीशिवाय दुसन्यांदा आयोजित केलेल्या बैठकीमध्ये तातडीच्या गरजा व सामान्य स्वरुपाच्या बाबी यावरच निर्णय व मान्यता (आधीच्या बैठकीत मान्य केलेल्या धोरणानुसार) घेण्यात यावी. नवीन उपक्रम किंवा नवीन आर्थिक खर्चाच्या बाबीसाठी धोरणात्मक निर्णय किंवा मान्यता घेण्यासाठी आयोजित बैठकीसाठी ५० टक्के गणपुर्ती आवश्यक राहील.

४. जन आरोग्य समिती आर्थिक वर्षाच्या शेवटच्या बैठकीत चालू वित्तीय वर्षातील कामकाजाचा व घटकनिहाय खर्चाचा लेखा अहवाल / वार्षिक अहवाल सादर करेल आणि पुढील वित्तीय वर्षासाठी कृती आराखडा (नियोजन) तयार करण्यासाठी पर्यवेक्षिय यंत्रणा म्हणून कार्य करेल.

५. आपला दवाखाना स्तरावर मागील वित्तीय वर्षाचा भौतिक व आर्थिक अहवाल पुढील वित्तीय वर्षाच्या माहे एप्रिलमध्ये समितीच्या आयोजित बैठकीत सादर करुन समितीची मान्यता घ्यावी.

६. दरवर्षी माहे एप्रिल-मे या महिन्यात आरोग्य विषयक कार्यक्रम / योजना आखण्याचे नियोजन करावे. त्यानुसार आरोग्य, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी आरोग्यविषयक नियोजनाच्या बाबी महानगरपालिका, नगरपरिषदा / नगरपंचायती व कटकमंडळे यांच्या वार्षिक नियोजन प्रक्रियेत सादर करता येतील.

७. जन आरोग्य समितीच्या बैठकीत प्रत्येक प्रस्तावित कार्यक्रम / योजना व त्यावरील खर्चास बैठकीस उपस्थित असलेल्या किमान २/३ सदस्यांची मान्यता घ्यावी. मागील बैठकीपासून हाती घेण्यात आलेली सर्व कामे व त्यावरील झालेल्या खर्चास बैठकीत मान्यता घ्यावी. बैठकीत सादर केलेल्या सर्व प्रस्तावांवर उपस्थित सदस्यांनी एकमताने अथवा होकार दर्शवून आपली मते नोंदवावीत व त्यास समितीची मान्यता घ्यावी.

८. जन आरोग्य समितीच्या प्रत्येक बैठकीच्या इतिवृत्ताची दप्तरी नोंद ठेवण्यात यावी. मागील महिन्यातील उपक्रमांचे लेखांकन व खर्चाचे दस्ताऐवजीकरण करावे.

९. जन आरोग्य समितीच्या प्रत्येक बैठकीत नियमित विषयसुचीव्यतिरिक्त आपला दवाखान्यातील इतर विषयाचा संच विषयसुचीमध्ये समाविष्ट करून सादर करावा.




७) जन आरोग्य समितीचा अबंधीत निधी (Untied Funds) :-

१. आपला दवाखान्याकरीता प्रति दवाखाना प्रति वर्ष रक्कम रु.१,००,०००/- याप्रमाणे आवर्ती खर्चासाठी अबंधीत निधीची तरतूद करण्यात येते.

२. अबंधीत निधी हा लवचिक (Flexd-pool) निधी आहे व समितीच्या निर्णयानुसार अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचा वापर करावा.

३. रूग्णांना व नागरिकांना मूलभूत व निकोप आरोग्य सेवा व सुविधांची खात्री करुन देणे आणि समुदायस्तरावर आरोग्य संवर्धनास मदत करणे ही अबंधीत निधीतून खर्चास प्राधान्य देणारी दोन स्तंभे आहेत. या मुलभूत तत्वांचे पालन करुन स्थानिक गरजा व प्राधान्यक्रम ठरवून त्यावर आधारित खर्च करावा.

४. अबंधीत निधी हा आपत्कालीन परिस्थितीत सर्व सामान्यांच्या सार्वजनिक हितासाठी वापरण्यात यावा. अबंधीत निधी हा व्यक्तीगत गरजांसाठी नाही.

५. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा संदर्भ व वाहतुकीच्या बाबी वगळता केवळ गरीब, वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्ती व निराधार महिलेस तातडीची आरोग्य सेवा देणे आवश्यक असल्यास, त्यांचेकरिता तातडीच्या आरोग्य सेवेसाठी आपत्कालीन परिस्थितीत रक्कम रु. ५००/- या मर्यादेत अबंधित निधी वापरावा.

६. जन आरोग्य समितीने आरोग्य सेवाविषयक गरजा पुर्ण करणेसाठी स्थानिक समुदायामार्फत संसाधने स्विकारणे, योगदान दिलेल्या व्यक्ती अथवा संस्थांची नोंद घेऊन आरोग्यविषयक प्रोत्साहन दिन व वार्षिक जनसंवादाच्या दिनी अथवा सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचा सत्कार व सन्मान करावा.

७. नियमित पुरवठयामध्ये खंड पडल्यास अथवा तातडीच्या गरजा भागविणेसाठी व संस्था देखभाल, औषधी व वैद्यकिय उपकरणे / साहित्ये इत्यादी खरेदीसाठी अबंधीत निधीचा वापर करावा. खरेदी

करण्यात आलेल्या औषधी व वैद्यकिय उपकरणे / साहित्ये ही राज्य शासनाने प्रसिध्द केलेल्या मुळ अत्यावश्यक यादीतील एक भाग असणे आवश्यक आहे.


८) अबंधित निधीतून खर्च करावयाच्या बाबी

१. मनुष्यबळाच्या खर्चाव्यतिरिक्त आपला दवाखान्याचा परिसर स्वच्छतेसाठी लागणा-या उपयोग्य वस्तू (झाडू, खराटा, टिकाव, पाटी, इत्यादी).

२. प्रसाधनगृहातील स्वच्छता (फिनेल, ब्लिचिंग पावडर, हँडवॉश, इत्यादी).

३. सुरक्षित टाक्या / शौचालयांच्या किरकोळ दुरुस्ती. ४. रुग्णांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय. ५. दिशादर्शक फलके / चिन्हे.

६. जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व विल्हेवाट.

७. आरोग्यविषयक प्रोत्साहन दिवस आणि लोक कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन (उपकरणे खरेदी वगळता).


९) अबंधित निधीतून खर्च न करावयाच्या बाबी-

१. नियमित देखभाल व दुरुस्तीकरिता निधी अथवा अनुदान उपलब्ध आहे असा खर्च ( दुरध्वनी, वीज व पाणी देयके इत्यादी.)

२. मनुष्यबळ / व्यक्तीगत खर्च (वाहनचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सफाई कामगार इत्यादी.)

३. अत्यावश्यक यादीत समाविष्ट नाहीत अशी औषधे, निदानात्मक साहित्य / वैद्यकिय उपकरणे खरेदी.

४. शासनाच्या कार्यक्रमाव्दारे खरेदी / पुरवठयासाठी तरतूद केली आहे अशा वस्तू किंवा उपक्रमे.

५. इमारतीचा मोकळा परिसर, बाहेरील व्यायामशाळा अथवा व्यायामाशी संबधीत उपकरणे / साधने अथवा बांधकामे, इत्यादी.


१०) अबंधित निधीचे आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरिक्षण:-

१. जन आरोग्य समितीचे बँक बचत खाते हे समितीचे सहअध्यक्ष व सदस्य सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरीने चालविणे बंधनकारक राहील. यासाठी आपला दवाखाना स्तरावर जन आरोग्य समितीचे राष्ट्रीयकृत बँकेत अथवा अधिसुचित (शेड्युल्ड बँकेत नविन बचत खाते उघडण्यात यावे.

२. बँक खात्यातून कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम काढण्यात येऊ नये व रोख स्वरुपात कोणताही आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये. सर्व देयकांच्या रक्कमा धनादेश / धनाकर्ष / नेट बँकिंग / डिजिटल बैंकिग याद्वारे अदा कराव्यात.

३. जन आरोग्य समितीच्या प्रत्येक बैठकीत मागील महिन्यातील खर्चाचा तपशीलवार अहवाल सादर करावा व त्यास समितीची मान्यता घ्यावी.

४. जन आरोग्य समितीचे सह अध्यक्ष व सदस्य सचिव यांनी त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीसह प्रत्येक महिन्यातील खर्चाचे तक्ते आणि GFR १२-C नमुन्यात उपयोगिता प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयात सादर करावे.

५. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जन आरोग्य समित्यांचे दर तिमाहीला व प्रत्येक वित्तिय वर्षाअखेर वैधानिक लेखापरिक्षण करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार आपला दवाखाना स्तरावर त्रैमासिक समवर्ती लेखापरीक्षणावेळी व वैधानिक लेखापरीक्षणादरम्यान सदस्य सचिव यांनी जन आरोग्य समितीमार्फत झालेल्या खर्चाचे व विनियोजनाचे लेखापरीक्षण करुन घ्यावे.

६. अबंधित निधीतून हाती घेतलेल्या योजना / उपक्रमे व त्यावरील खर्चाचा वार्षिक अहवाल पुढील वित्तिय वर्षाच्या माहे एप्रिल महिन्यातील जन आरोग्य समितीच्या बैठकीत सादर करावा. हा वार्षिक अहवाल आपला दवाखान्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा एक भाग राहील.

७. जन आरोग्य समितीमार्फत आपला दवाखाना स्तरावर होणारा खर्च, खरेदी, सेवा, इत्यादी साठी राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करावा.


११)जन आरोग्य समितीच्या अध्यक्षाची कार्ये, अधिकार व प्रमुख जबाबदाऱ्या:-

१. जन आरोग्य समितीच्या अध्यक्षांना सर्व बैठकांच्या आयोजनाचे व त्या बैठकांचे अध्यक्ष पद भुषविण्याचे

अधिकार राहतील.

२. जन आरोग्य समितीचे कार्य व प्रगती याचा आढावा घेणे आणि आरोग्य सेवाविषयक तक्रारी प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार राहील.

३. बैठकीतील वादग्रस्त बाबी मतदानाद्वारे सोडविणे. समिती सदस्यांमध्ये एकमत न झाल्यास, निर्णायक मतदानाचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना असेल.

४. आरोग्य सेवाविषयक तातडीच्या गरजा भागविण्यासाठी समितीचे अध्यक्ष हे सदस्य सचिवाच्या सल्ल्याने योग्य निर्णय घेऊ शकतात.


१२) जन आरोग्य समिती सदस्य सचिवाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या:-

१. जन आरोग्य समितीचे सदस्य सचिव हे समितीच्या बैठका, बैठकीची कार्यवाही व बैठकीतील ठराव यांच्या नोंदी घेतील व त्यावरील कार्यवाही सुनिश्चित करतील.

२. दैनंदिन प्रशासनाचे व्यवस्थापनाकरीता समितीच्यावतीने पत्रव्यवहार करणे, सर्व व्यवहाराच्या नोंदी ठेवणे व जंगम मालमत्ता ताब्यात ठेवणे.

३. समितीच्यावतीने सर्व देयके, पावत्या, व्हाऊचर्स, करार व इतर महत्वाचे कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे.

४. एखादया कार्यासाठी उपसमिती तयार करणे व त्या उपसमितीला अधिकार सोपविणे.

५. निश्चित केलेल्या कार्यासाठी / उपक्रमासाठी वित्तिय तरतूदींचा प्रस्ताव बैठकीत सादर करणे व त्यास मान्यता घेणे.

६. अध्यक्षाशी सल्लामसलत करुन तातडीच्या बाबींवर कार्यवाही करुन निर्णय घेणे.

७. समितीच्या बैठकीत पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवणे व त्यांचे कामकाज समितीसमोर सादर करणे.

८. आपला दवाखान्याकरिता आरोग्य सेवा व सुविधा व निश्चित केलेली गुणवत्ताविषयक मानके यांचा आढावा घेणे व त्यावर देखरेख ठेवणे.

९. समितीच्या बैठकांशी संबंधित नोंदी, भौतिक व आर्थिक बाबींच्या नोंदी व दस्ताऐवज दप्तरी जतन करणे व सुस्थितीत ठेवणे.


१३) जन आरोग्य समितीच्या अंमलबजावणीसाठी महत्वपुर्ण सुचना:-

१. आपला दवाखान्यास्तरावर वर्षभरात आयोजित उपक्रम, त्यावरील यश, अपयश, आव्हाने व माहितीची देवाण - घेवाण याकरीता समुदायस्तरावर दरवर्षी एक याप्रमाणे जनसंवादाचे आयोजन करणे. यामध्ये एकत्रित केलेल्या त्रुटींच्या बाबींविषयी चर्चा करुन सामोपचाराने प्रश्न निकाली काढणे, शक्य असल्यास वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये त्यांचा समावेश करणे.

२. विविध शासकिय योजनाविषयी माहिती व त्यावरील हक्कांविषयी जागरुकता वाढविण्यासाठी रेडिओ व सोशल मिडिया यावर प्रचार व प्रसार करणे.

३. आपला दवाखाना स्तरावर नाविण्यपुर्ण योजनेवर भर देऊन आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीरित्या पुर्ण करणे.

४. आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या खर्चाची मान्यता पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करुन कार्योत्तर मान्यता घेणे अनिवार्य आहे.

५. आपला दवाखानास्तरावर दिल्या जाणान्या आरोग्य सेवांचा प्रचार व प्रसार करणे हे एक प्रमुख कार्य आहे. आरोग्य संवर्धन, जीवनशैलीमधील बदल, प्रतिबंधात्मक उपचार पध्दतीची योग्य प्रक्रिया सुरु करणे व त्यास चालना देणे.

६. अबंधीत निधीतून अनुज्ञेय असलेल्या खर्चाच्या विविध बाबींमध्ये इष्टतम नियंत्रण राखले गेले पाहिजे. जसे की, (अ) परिसराची देखभाल, (ब) रुग्ण सुविधा व (क) पायाभूत सुविधाची देखभाल या प्रत्येक श्रेणीमध्ये कमाल २०% खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात येत आहे.

७. जन आरोग्य समितीच्या मासिक बैठका रचनात्मक असाव्यात. बैठकीच्या विषयसुचीत एकसूत्रता असावी. आवश्यकता भासल्यास अध्यक्ष हे सदस्य सचिवासोबत विषयसुचीवर चर्चा करतील.

८. जन आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत आपला दवाखान्याच्या प्रगतीचा आढावा, वार्षिक नियोजन व प्रशासकिय बाबी यावर चर्चा करावी.

९. जन आरोग्य समितीच्या मासिक बैठकीसाठी प्रती बैठक जास्तीत जास्त रु.४००/- (चहा / नाश्ता / इतिवृत्त छायांकन करणे) या मर्यादेत खर्च करता येईल.

१०. प्रत्येक बैठकीच्या कामकाजाचे इतिवृत्त बैठकीनंतर शक्य तितक्या लवकर समितीच्या सदस्यांना वितरित करणे अनिवार्य राहील.


१४) जन आरोग्य समितीची नोंदणी:-

जन आरोग्य समिती ही महानगरपालिका क्षेत्राकरीता नागरी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा व नगरपरिषदा / नगरपंचायती व कटकमंडळे क्षेत्रांकरीता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचा एक अविभाज्य घटक म्हणून कामकाज करेल व त्यासाठी जन आरोग्य समितीची कोणत्याही कार्यालयाकडे स्वतंत्ररित्या नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.


राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका / खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत


राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत.


 राज्यातील विद्याथ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने शाळा स्तरावर तातडीने करावयाच्या उपाययोजनाबाबत


 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.